हा तर विद्यादानाचे कार्य करणाऱ्या स्त्रीशक्तीचा विजय..
माजी अर्थमंत्री आ.मुनगंटीवार यांचे प्रतिपादन*
चंद्रपूररात द्रौपदी मुर्मु यांच्या विजय जल्लोषासाठी एकवटलाआदिवासी समाज
*भाजपा अनु.जमाती मोर्चाचे आयोजन*
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
भारतीय जनता पार्टीने नेहमी सेवेला महत्व दिले.समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी राजकारण केले.आदिवासी समाजाला प्रतिनिधित्व मिळावे ही भाजपाची संकल्पना आहे.त्यामुळेच भाजपाने विद्यादानाचे पवित्र कार्य करणाऱ्या श्रीमती द्रौपदी मुर्मु यांना राष्ट्रपती पदाची उमेदवारी दिली.त्या प्रचंड मतांनी विजयी झाल्या.त्यांचा विजय हा वीर बिरसा मुंडा यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवणाऱ्या व विद्यादानाचे पवित्र कार्य करणाऱ्या स्त्री शक्तीचा विजय आहे,असे प्रतिपादन माजी अर्थमंत्री आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी केले.
ते गांधी चौक येथे भाजपा अनु.जमाती (आदिवासी) मोर्चा तर्फे आजोजित श्रीमती दौपदी मुर्मु यांच्या *'विजयाचा उत्सव समारोह'* प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गुरुवार(21 जुलै)ला बोलत होते.
यावेळी मंचावर भाजपा जिल्हाध्यक्ष(ग्रा)देवराव भोंगळे,जिल्हाध्यक्ष(श)डॉ.मंगेश गुलवाडे,भाजपा नेते राजेंद्र गांधी,ब्रिजभूषण पाझारे,सुभाष कासंगोट्टूवार,रवींद्र गुरनुले,माजी महापौर राखी कंचर्लावार,माजी उपमहापौर राहुल पावडे,अंजली घोटेकर,विशाल निंबाळकर,भाजपा अनु.जमाती मोर्चा जिल्हाध्यक्ष(श)धनराज कोवे,जिल्हाध्यक्ष(ग्रा) ऍड हरीश गेडाम, अशोक आलम,संदीप युईके,सौ.चंद्रकला सोयाम,माया ताई ऊईके,ज्योती गेडाम,कीशोर आत्राम,कु.रंजना किन्नाके,रेखा मडावी,भिमा मडावी,विकी मेश्राम,लिनाताई कुसराम, गंगुबाई मडावी,गिताताई गेडाम,शिलाताई आत्राम, अभय मडावी,गंगाधर मडावी,संजय टेकाम,दत्तू कोरवते यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.विशेष म्हणजे या प्रसंगी जिल्ह्यतील विविध आदिवासी संघटनेतील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ.मुनगंटीवार म्हणाले,भारताच्या राष्ट्रपती या सर्वोच्च पदावर प्रचंड बहुमताने निर्वाचित झालेल्या श्रीमती द्रौपदी मूर्मु यांचा विजय हा वीर बिरसा मुंडा यांच्या विचारांवर श्रद्धा स्त्री शक्तीचा विजय आहे. मुर्मू यांचा विजय सुनिश्चित होताच फक्त औपचारिकता बाकी होती. मुंबईत त्या आमदार व खासदारांशी संवाद साधताना म्हणाल्या होत्या की 'मै भगवान और अपमान से डरती हू'. त्यांचे ते भाषण ओठातून नव्हे तर हृदयातून होते, मनातून नव्हे तर अंतरात्म्यातून होते. ज्यांनी पर्यावरणाला देवस्वरूप मानले असे व्यक्तिमत्त्व स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात देशाच्या राष्ट्रपती पदी विराजित होणे हा मोठा योग आहे.वीर बिरसा मुंडा यांच्या विचारांना पुढे नेत समाजाच्या विकासासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या श्रीमती द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती पदी विराजमान होणे हा सर्वसामान्य भारतीयांचा गौरव आहे,असेही ते म्हणाले.
यावेळी आदिवासी बांधव बहुल असणाऱ्या 13 वार्डातील आदिवासी बांधवांनी सहकुटुंब उपस्थिती दर्शविली.तर महानगरात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यान्नी स्वयंस्फूर्त सहभाग घेतला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन धनराज कोवे यांनी केले,तर ऍड. हरिष गेडाम यांनी आभार मानले.
*तरुणाई सोबत आ.मुनगंटीवार थिरकले*
आयोजकांनी विजयी जल्लोष साजरा करण्यासाठी आदिवासी समाजाच्या किमान 8 पारंपरिक नृत्य वाद्यवृंदाला पाचारण केले होते.गोंडी नृत्य संगीतावर तरुणाई जल्लोष करीत असताना आ.सुधीर मुनगंटीवार हे ही थिरकले.कार्यक्रमानंतर हा विषय महानगरात चर्चेचा ठरला.यावेळी मोठ्या प्रमाणात आतषबाजीही करण्यात आली.
*शाहिद स्मारक भूमीला केले वंदन*
विजय जल्लोष झाल्यावर ऐका विशाल रॅलीच्या माध्यमातून वाजत, गाजत व नाचत समस्त जनसमुदाय वीर बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांना आदरांजली वाहण्यास जिल्हा कारागृह परिसरातील शाहिद स्मारक भूमी येथे पोहोचला.येथे आदरांजली अर्पण केल्यावर,विजय जल्लोषाची सांगता करण्यात आली.
दिनचर्या न्यूज