नागाळा ग्रामपंचायतीने चिंचाळा - वांढरी रोडवरील सार्वजनिक खुल्या जागेवरील अतिक्रमण हटविले





नागाळा ग्रामपंचायतीने चिंचाळा - वांढरी रोडवरील सार्वजनिक खुल्या जागेवरील अतिक्रमण हटविले

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
ग्रामपंचायत नागाळा चिंचाळा येथील वांढरी रोड वर असलेले अवैद्य अतिक्रमण ग्रामपंचायतने पोलीस बंदोबस्तात हटविले. अनेक वर्षापासून या जागेवर अतिक्रमण केले जात असल्याचे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. संबंधित अतिक्रमणावर बुलडोजर चालवल्या गेले. या कारवाईमुळे खुल्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.
दिनांक २९/०९/२०२२ रोज गुरुवारी सकाळी १०.०० ते ६.०० वाजेपर्यंत मौजा चिंचाळा येथील वांढरी रोड सर्व्हे नं. ३९/५० मधील सर्वानिक खुल्या जागेवरील श्री. राकेश उपाध्याय यांचे चाय, पान/खर्रा सेंटर व गाईच्या गोठ्याचे अतिक्रमण पोलिस बंदोबस्तात ग्रामपंचायत नागाळा (सि) च्या वतीने हटविण्यात आले. सदर अतिक्रमण हटविताना ग्रामपंचायत नागाळा (सि) च्या सरपंच श्रीमती. शोभा भिमराव चिमूरकर, उपसरपंच श्री. सुज्जन महादेव सातपुते, सदस्य श्री. प्रकाश शंकरराव शेंडे, सदस्य श्री. मंगेश आबाजी घुगुल, सदस्य श्री. नितीन प्रभाकर टेकाम, सदस्य श्री. विवेक पुरुषोत्तम धोटे, सदस्या सौ. कमल भाऊराव शेंडे, सदस्या सौ. निर्मला दिलीप कामडी, सदस्या सौ. सुवर्णा रामचंद्र आसुटकर, सदस्या सौ. माया जयंता धोटे, सदस्या सौ. स्वाती प्रशांत काकडे, सदस्या सौ. संगीता माणिकचंद थोरात, ग्रामविकास अधिकारी श्री. सुधाकर रघुनाथ वासेकर व नायब तहसिलदार श्री. गादेवार साहेब यांच्या निर्देशानुसार मंडळ अधिकारी श्री. किशोर नवले, तलाठी नागाळा श्री. रविंद्र तल्हार तसेच तंटामुक्ती समिती चिंचाळा अध्यक्ष श्री. सुरेश पिदुरकर व पोलिस कर्मचारी पडोली श्री. दादाराव तळवेकर, श्री. स्वप्नील बुरीले, श्री. किशोर वाकाटे व महिला शिपाई, वार्डातील नागरिक सौ. उज्वला नलगे, श्री. भाऊराव शेंडे, श्री. गोपाल नांदुरकर, श्री. यशवंत मानकर, श्री. नंदकिशोर सगणे, श्री. आकाश क्षिरसागर, श्री. मयूर धोटे, श्री. रमेश क्षिरसागर, श्री. जंगलू अटकारी, श्री. ओमप्रकाश मैंद, श्री. नितीन वांढरे, श्री. शंकर अतकारे, श्री. बंडू क्षिरसागर, श्री. श्रीकृष्ण अटकारी, श्री. सचिन अटकारी, श्री. गणेश मानकर, शुभम क्षिरसागर, तुषार लोनगाडगे, श्री. आतिश चिमूरकर, श्री. एकनाथ देवतळे श्री. पुंडलिक कुमरे, श्री. यादव आवारी, श्री. नागेश्वर सिंग तसेच ग्रामपंचायत कर्मचारी. श्री. सुरेश सपाट, श्री. विठ्ठल भोजेकर, श्री. सतीश विरूटकर, श्री. स्वप्नील सेडामे, श्री. राजू मरसकोल्हे, श्री. सुनील कांबळे, श्री. शंकर मरसकोल्हे, श्री. क्रांती मरसकोल्हे, श्री. गजेंद्र गौरकार इत्यादी उपस्थित होते. या कारवाईमुळे नागरिकानी ग्रामपंचायतीचे स्वागत केले आहे.