अत्याधुनिक सुविधांसह जिल्ह्याचा विकास, मिड द प्रेस मध्ये ना. सुधीर मुनगंटीवार यांचे....





अत्याधुनिक सुविधांसह जिल्ह्याचा विकास, 'मिड द प्रेस' मध्ये ना. सुधीर मुनगंटीवार यांचे...

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :
महाराष्ट्र राज्याचे वने व सांस्कृतिक तथा मत्स्य मंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी आज श्रमिक पत्रकार भवनात आयोजित मीट द प्रेस आयोजित कार्यक्रमात मागील पाच वर्षात आणि आता आपल्याला मिळालेल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळ यासंदर्भात मध्यम आणि मोठे झालेल्या व होणार असलेल्या कामाची सविस्तर माहिती सांगितली. महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण शासकीय कार्यालयात हॅलो ऐवजी 'वंदे मातरम' सुरु करावा असा पण निर्णय घेतला.
कुठल्यातरी एका उद्योगपतीच्या सांगण्यावरून कमलापूर येथील हत्तींचे स्थानांतर करण्यात आले अशी माहिती विचारण्यात आली. उत्तर देताना. सांगितले की,गडचिरोली जिल्ह्याची कमलापूर येथील हत्तीचे स्थानांतर यासंदर्भात प्रामुख्याने वन मंत्री या यांनी माहिती देताना सांगितले की , येतील हत्ती हे काही वयस्कर झाले असताना. त्यांच्याकडे आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वैद्यकीय अधिकारी नसल्याने आरोग्य संदर्भाची समस्या हे मुख्य कारण ठरवण्यात आले. तसेच कुठल्याही संस्थेच्या माध्यमातून यांची पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली तर आपण त्या हतीना त्या ठिकाणी पूर्ववत आणल्या जातील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यापूर्वी झालेल्या पाच वर्षाच्या काळात अनेक विकासकामे करण्यात आली आहे. आता पुन्हा अडीच वर्ष मंत्रिपद मिळाले आहे. त्यामुळे येणाऱ्या अडीच वर्षांत मोठी विकासकामे करायची असून 114 कामांची यादी तयार आहेत. आरोग, कृषी, शिक्षण अशा विविध क्षेत्रात जिल्हा स्वयंपूर्ण करायचा असून,महाराष्ट्रात एक कोटी 75 लाख अशिक्षित आहेत.
जिल्ह्याचा सर्वांगीण आणि सर्वोत्तम विकास हेच ध्येय असल्याचे राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित मीट द प्रेस कार्यक्रमात सांगितले. जिल्ह्यातील विविध विषयासंदर्भात माहिती पत्रकारांनी जाणून घेतली. तसेच शासनाचे नवीन धोरण, चंद्रपूर शहरात होणाऱ्या विकासासंदर्भात पत्रकारांनी वेगवेगळ्या कामाच्या व अपेक्षित असलेल्या कामाचे सूचना आमदार सुधीर मुनगंटीवार यांना .
जिल्ह्याच्या विविध विकासकामांवर त्यांनी माध्यमप्रतिनिधींशी संवाद साधत काही सूचनाही मागविल्या. शिंदे - फडणवीस सरकारमध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्रिपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या अजेंड्यावर या मीट द प्रेसमध्ये माध्यमप्रतिनिधींशी संवाद साधला. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांमध्ये मोळ्या प्रमाणात तलावांची संख्या असून, मासेमारी यातून मोठी रोजगारनिर्मिती होऊ शकते, असे सांगत यासाठी लवकरच धोरण तयार करणार असल्याचे त्यांनी,माहिती मुनगंटीवारांनी यावेळी दिली. शैक्षणिक क्षेत्रात मोठे काम करायचे असून, स्वतंत्र शैक्षणिक धोरणे असलेला चंद्रपूर हा राज्यातील पहिला जिल्हा असेल, यादृष्टीने प्रयत्न करणार आहे. आरोग्याच्या बाबतीत जिल्हा स्वयंपूर्ण करायचा असून प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अद्ययावत सुविधा उपलब्ध करून दिले जाणार आहे. चार नवीन पीएचसी अत्याधुनिक सुविधासह निर्माण करण्यात आल्या आहेत. रुग्णालयात रिक्त पदे भरण्यात आली असून, पुढील काळात आणखी काही पदे भरणार असल्याची माहिती त्यांनी दिली. फोर्टीज हॉस्पिटलच्या माध्यमातून शेकडो लहान मुलांवर महागड्या शस्त्रक्रिया निःशुल्क करण्यात आल्या आहेत. याच कंपनीने एक साप्टवेअर उपलब्ध करुन दिले असून, या माध्यमातून जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय यंत्रणा अद्ययावत करून रुग्णांचा डाटाबेस तयार केल्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. कॅन्सर हॉस्पिल, विमानतळ, महाकाली मंदिराचे सौंदर्यीकरण, शेतकरी प्रशिक्षण केंद्र, कृषी विद्यापीठ, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात रिसर्च सेंटर आदी कामांना गती देण्यात आली असून, येणाऱ्या काही महिन्यात ही कामे सुरु झालेली दिसतील
विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्ह्यात अत्याधुनिक अकादमीसाठी प्रयत्न करू असेही त्यांनी
मविआ सरकारने कमी केलेल्या डीपीडीसीच्या निधीत पुन्हा वाढ करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. तत्पूर्वी पत्रकार संघाचे अध्यक्ष मझहर अली, संघटन सचिव योगेश चिंधालोरे यांच्या हस्ते नामदार सुधीर मुनगंटीवार यांना शाल, श्रीफळ आणि पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला.