पंचायत समितीच्या मासिक आढावा सभेवर ग्रामसेवक सह वर्गाच्या बहिष्कार

पंचायत समितीच्या मासिक आढावा सभेवर ग्रामसेवक सह वर्गाच्या बहिष्कार

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
ग्रामसेवक सह वर्गाच्या जिल्हा परिषद प्रशासनाने प्रलंबित मागण्या मान्य न केल्यामुळे आजच्या पंचायत समिती मासिक सभेच्या आढावा सभेवर बहिष्कार टाकण्यात आला. महाराष्ट्र ग्रामसेवक युनियनDNE जिल्हा शाखा चंद्रपूरच्या वतीने आज दिनांक2/11/2022 रोजी चंद्रपूर पंचायत समिती होत असलेल्या मासिक सभेवर ग्रामसेवकांच्या वतीने बहिष्कार टाकण्यात आला. शासना कडे वारंवार मागण्या करीत असले तरी आतापर्यंत शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.विविध मागण्या संदर्भात जिल्हास्तरावर असहकार सुरू असल्याने आज जिल्हा परिषद प्रशासनाच्या प्रबंधित मागण्या संदर्भात सर्व पंचायत समितीतील ग्रामसेवकांनी आपल्या मासिक सभेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. यावेळी ग्रामसेवक हर्षवर्धन खोब्रागडे, रवींद्र चावरे, इ .एन .पिंपळशेंड, जी. जे. देवगडे, राजेश भानोसे, वेखंडे, तुरे, मुनगंटीवार, एकनाथ मेश्राम, राजेश उगले, गणेश मार्गनवार, कुमारी निकोडे, कुमारी आर.डी.मुडे, कु.व्ही.व्हि.मानकर, एस यु गाडगे, डी एस चव्हाण, ए .एम .चौधरी, एम के मेश्राम,बि.बि. दंडारे या सह ग्रामसेवकांनी आज पंचायत समितीत मासिक सभेवर बहिष्कार टाकण्यात आला.