औद्योगिक व ऑटोमेशन क्षेत्रात इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना करीअर घडविण्याची सुवर्ण संधी
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
आज अभियांत्रिकी (ENGINEERING) चे शिक्षण पूर्ण करून सर्व अभियांत्रिकेचे विद्यार्थी स्वतःला प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. परंतु जे विद्यार्थी काहीतरी नाविन्यपूर्ण गोष्टी करून स्वतःला सिध्द करतात, त्यांनाच सर्वोत्तम यश प्राप्त होते. मागील काहि दशकांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान व अभियांत्रिकी च्या शिक्षणामध्ये खूप झपाट्याने लक्षणीय प्रगती झालेली आहे. अभियांत्रिकी ने आज खूप साऱ्या क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञाना द्वारे संयंत्रांची (Machinery) निर्मिती केली आहे व ते सयंत्र आज खूप झपाट्याने आमच्या विश्वामध्ये प्रत्येक दिवशी एक एक नवीन आमुलाग्र बदल घडवून आणत आहेत. गतिशील विकासाकरिता सर्व देशांमध्ये आज अकुशल मनुष्यबळा ऐवजी आविष्काराने ने संपन्न असलेल्या "ऑटोमेशन आणि त्याच्या संचालना संबंधित " (Automation & Operation) उपलब्ध असलेली आधुनिक स्वयंचलित प्रणाली सयंत्राचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे असे कौशल्य असलेल्या अभियंत्याची प्रचंड मागणी वाढत आहे, त्यामुळे अशातच इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग शाखेला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहें.
इन्स्ट्रुमेंटेशन पदवी अभ्यासक्रमानंतर त्याच विषयातील पदव्युत्तर / पीएचडी अभ्यासक्रमास प्रवेश घेता येतो. इतकेच नव्हे तर विद्युत महानिर्मिती (MAHAGENCO), गॅस ऑथॉरिटी इंडिया लिमिटेड (GAIL), स्टील ऑथॉरिटी इंडिया लिमिटेड (SAIL), भारत हेवी इलेक्ट्रीकल्स लिमिटेड (BHEL), ऑइल अँड नॅच्यूरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC), इंडीयन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL), आर. सी. एफ. (RCF), आय.पि.सी.एल. (IPCL), डी.आर.डी.ओ. (DRDO), इस्रो (ISRO), नुक्लीअर पावर कॉर्पोरेशन लिमिटेड (NPCL), एन.टी. पी.. सी. (NTPC), इंडिअन एअर फोर्स, नेव्हि, डॉक यार्ड आदी राज्य व केंद्र सरकारी संस्थामध्ये नौकरीसह संशोधनाच्या देखील संधी उपलब्ध आहेत.
आताचे ऑटोमेशन क्षेत्र प्रोसेस ऑटोमेशन, इंडस्ट्रीयल ऑटोमेशन, बिल्डींग ऑटोमेशन, बायोमेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन सॉफ्टवेअर इन्स्ट्रुमेंटेशन, रोबोटिक ऑटोमेशन, ऑटोमोबाईल इन्स्ट्रुमेंटेशन, माईनिंग ऑटोमेशन अशा बहुविध क्षेत्रात विभाजित आहे. वरील सर्व क्षेत्रामध्ये इन्स्ट्रुमेंटेशनचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. रॉकवेल ऑटोमेशन, जॉन्सन कंट्रोल्स, लार्सन & टुब्रो, इन्फोसिस, इमरसन, महिंद्रा, एबीबी, सिमेन्स, बॉश, टाटा मोटर्स, हानिवेल, थर्मेक्स, अल्फा लवाल, सँडविक एशिया, बी&आर ऑटोमेशन, रसायन उद्योग जसे खते, पेपर रंग, कापड उद्योग सह आंतरराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये नोकरीच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत. सर्व पॉवर इंडस्ट्रीज, सीमेंट इंडस्ट्रीज तथा सर्व प्रोसेस इंडस्ट्रीज मध्ये या अभियंत्याची विशेष मागणी दिसून येते.
सर्वात महत्वाचे, इन्स्ट्रुमेंटेशन अथवा इन्स्ट्रुमेंटेशन व कंट्रोल पदवी अभ्यासक्रम भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्या मध्ये फारच मोजक्या ठिकाणी उपलब्ध आहे, त्यामध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपुर हे एक अग्रगण्य महाविद्यालय आहे. दर वर्षी उत्तीर्ण होणाऱ्या अभियंत्यांची संख्याबळ कमी असल्यामुळे इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनीयर ची प्रचंड मागणी वाढत आहे.