रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेत आर्थिक घोटाळ्याची सहकार मंत्राकडे तक्रार...





रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेत आर्थिक घोटाळ्याची सहकार मंत्राकडे तक्रार...

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :- ३० /१/२०२३
यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यातील रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेत अध्यक्ष व संचालकांच्या संगनमतातून भ्रष्टाचार व आर्थिक घोटाळा झाला असल्याची तक्रार पुराव्यानिशी सहकारमंत्र्यांसह सहकार आयुक्तांकडे करण्यात आल्याची माहिती चंद्रपूर येथे श्रमिक पत्रकार परिषदेत आयोजित पत्रकार परिषदेतून प्रशांत खडसान, अविनाश आसेकर, आकाश ठमके, सुनील पाचभाई यांनी गंभीर आरोप केले आहे.
श्री. रंगनाथ स्वामी नागरी सह पतसंस्था मर्या. वणी या संस्थेमध्ये सभासदांच्या जवळपास ७०० कोटींच्या ठेवी आहे, अध्यक्ष व संचालक मंडळाच्या अनागोंदी व अमर्याद कर्ज वाटपामुळे धोक्यात आल्या आहे. पतसंस्थेचा मोठ्या प्रमाणात NPA वाढला असुन संस्था प्रत्यक्षात तोटयात असतांना खोटा नफा दाखवून सभासदांची दीशाभुल करणे सुरू असल्याचा आक्षेप पत्रकार परीषदेमध्ये करण्यात आला.
पतसंस्थेने एका प्रकरणात इंडस्ट्रीज झोन वरील जमीनीवर ५ कोटी रू. कर्ज दिले आहे. सदर जागेची शासन परवानगी नसतांना ले-आऊट मंजूर नसतांना इंडस्ट्रीज झोन वरील या जमीनीवर ५ कोटीचे कर्ज दिलेले आहे. विशेष म्हणजे यातील ४ भागीदारांपैकी फक्त दोनच भागीदारांनी महाणखत करून दिलेले आहे.
आणखी एका प्रकरणात पतसंस्थेने रंगनाथ चेंबर ची तीन मजली इमारत ३ कोटी १६ लक्ष ६९६ रुपयात विकत घेतली आहे पण अजून पावेतो त्याची खरेदी करण्यात आलेली नसून प्रत्यक्षात मात्र बरीच मोठी रोख रक्कम जागेच्या मालकाला अदा करण्यात आली आहे.


भ्रष्टाचाराचे आरोप खोटे, अध्यक्ष देविदास काळे

ज्यांनी पत्रकार परिषदेतून आरोप केले आहे त्यांनी काही दिवसापूर्वीच संस्थेतील 1 कोटी 81 लाख ठेवी गबाळ केल्याचे उघडकीस आले होते. म्हणून त्यांना संस्थेतून काढण्यात आले. त्यात त्यांच्या पत्नी सुद्धा होत्या. एडिट रिपोर्ट आल्यावर फौजदारी कारवाई करू. या संस्थेमध्ये पत्रकार परिषद घेणाऱ्यांचे एकही ठेवी नाही. उलट यांनी इतर संस्थेमध्ये खातेदारांना भूल थापा देऊन इतर संस्थेत ठेवी ठेवण्यास सांगत होते.
त्यांना नोकरीवरून काढण्यात आले. त्यामुळेच चिडून त्यांनी तक्रार केली. स्थानिक राजकारण्यांनी या पाच लोकांना पुढे केले आहे. बदनामी करण्याचा हा प्रयत्न आहे. भ्रष्टाचाराचे आरोप कोठे आहेत.नियमानुसारच पतसंस्थेकडून कर्जप्रक्रिया पार पाडली जाते, अशी प्रतिक्रिया रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे अध्यक्ष अँड. देविदास काळे यांनी दिली.

अध्यक्ष व संचालक मंडळानी आपल्या जवळच्या हितचिंतकांना आर्थीक लाभ देण्याच्या दृष्टीने ७५ लाख रू. कर्ज देण्याचा प्रस्ताव कोणत्याही मिटींग मध्ये न ठेवता परस्पर मंजूर केले हे सर्व कर्ज प्रकरणे पतसंस्थेच्या वरोरा, राजूरा, चंद्रपूर, आणी वणी या शाखेतून देण्यात आले आहे ही रक्कम कळमना जवळील एका बनावट कंपनीत गुंतवण्यात आल्याचे समजते.
पतसंस्थेने एका खातेदाराच्या खातेमध्ये दैनिक बचत ठेव, आर. डी. ठेव व मुदत ठेव खातेवर परस्पर लोन घेतले आहे हे यवतमाळ जिल्हयातील एका जुन्या शाखेत १० कोटी रूपयाचा घोटाळा उघडकीस आलेला आहे. या प्रकरणाची तक्रार झाल्यानंतर तपासणी अधिकाऱ्यांनी संचालक मंडळाशी संगणमत करून झालेला घोटाळा उघडकिस आणल्याचे टाळले व प्रकरणाची आवरासावर केली.
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या वेळी संचालक मंडळाशी हीतसंबंध असलेल्या एका व्यक्तीला त्याचे कर्ज NPA मध्ये असून सुध्दा त्याला कर्ज भरणा नियमीत असल्याचे प्रमाणपत्र वरोरा शाखेतून दिनांक २६/०२/२०२० ला शास्त्राव्यवस्थापक यांनी दिलेले आहे.
पतसंस्थेने आणखी एका कर्जदाराशी संगणमत करून मजूर, मित्र परिवार आणी नातेवाईक यांना ७० कोटी रूपयाचे कर्ज वाटप केले आहे. या सर्व कर्ज प्रकरणात एकच व्यक्ती सहकर्जदार आहे विशेष म्हणजे या प्रकणात अत्यल्प सेवाशुल्क घेण्यात आलेले असून संस्थेचे आर्थिक नुकसान केलेले आहे.

संस्थेत एक संस्थेच्याच नावाचे बनावट बचत खाते उघडण्यात आले आहे. त्या खात्यात रक्कम कुठून आली व ते काढण्याचे अधिकार कोणाला आहे याबाबत ठराव घेण्यात आलेला नाही. तसेच या व्यवहाराचे कोणतेच रोख रक्कमेचे व्हावचर उपलब्ध नाही करीता याखात्याची चौकशी झाली तर कोटयावधी रूपयाची अफरातफर उघडकीस येऊ शकते.
पतसंस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळाने मनमानी पध्दतीने कारभार चालविलेला आहे. या सर्व प्रकरणामध्ये सहकार मंत्री श्री अतुल सावे, सहकार आयुक्त पुणे, विभागीय सहनिबंधक कार्यालय अमरावती तसेच सहाय्यक निबंधक कार्यालय यवतमाळ यांचेकडे तक्रार करण्यात आलेली असून उपरोक्त सर्व प्रकरणांची ताबडतोब चौकशी सुरू करण्यात यावी. जर संस्थेची चौकशी झाली नाही तर ४८ हजार सभासदांचे हित आणि अनेकांचे पैसे बुडण्याची शक्यता पत्रकार परिषदेत उपस्थित...