प्रकरण न्यायप्रविष्ट, तरीही रेल्वे प्रशासनाची बेकायदेशीर हुकूमशाही, 28 तारखेपर्यंत घर पाडण्याचा पुकारा!
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर:- १७ /२/२०२३
शहरातील महानगर पालिका अंतर्गत येत असलेल्या शासकीय नझुल जागा रेल्वे लाईन झोपडपट्टी वासियांचे 40 ते50 वर्षापासून रहात असलेले 900 घर पाडण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाने वार्डात भोंगा फिरवून 28 तारखेपर्यंत घर खाली करण्यासाठी पुकारा केला आहे. या तारखेपर्यंत खाली न केल्यास झोपडपट्टीवर रेल्वे प्रशासनाचा बेकायदेशीर हुकूमशाही बुलडोजर चालणार आहे. अनेक वर्षापासून हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.
रेल्वे प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशी माहिती आज पत्रकार परिषदेतून
एड. फहरान बेग एड. कल्याण कुमार , हुमायू अल्ली, आणि समस्त वार्डातील नागरिकाची उपस्थिती होती.
या वार्डात शासनाने रस्ते, सार्वजनिक नळ, घरगुती नळ, तसेच सरकारी योजनेनुसार घरकुल, इंदिरा आवास योजना, सार्वजनिक विचार मंच, सभागृह, बगीच्या सर्व हितभुत सोयी सुविधा दिल्या आहेत. महानगरपालिकेने पट्टे देण्याचे ही प्रोसिजर तयार केली असून अधिकृत रीत्या राजपत्रातही झोपडपट्टीची यादी रीतसर आहे. असे असताना या दमकारी शासन आणि गोरगरीब जनतेच्या घरावर डोजर चालत असल्याने एवढ्या कुटुंबांनी जायचे कुठे, असा प्रश्न या गोरगरीब जनतेला निर्माण झाला आहे. जर रेल्वे प्रशासनाने बेकायदेशीर कारवाई थांबवली नाही तर ते प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन करणार असल्याचे पत्रकार परिषदेतून जाहीर केले आहे.