जिल्ह्यातील या पोलीस अधिकाऱ्यांचे स्थानांतर





जिल्ह्यातील या पोलीस अधिकाऱ्यांचे स्थानांतर

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :- ९/२/२०२३
जिल्हा पोलीस अधीक्षकाच्या कार्यालयातून झालेल्या
प्रशासकीय बदल्या तसेच काही अधिकाऱ्यांची निवृत्ती व जिल्ह्याबाहेर बदल्या झाल्याने तसेच काही अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्या मान्य करून जिल्हा पोलिस अधीक्षकांनी चंद्रपूर जिल्ह्यातील 20 पोलीस निरीक्षक, 11 सहायक पोलिस निरीक्षक व 3 पोलीस उपनिरीक्षक अशा एकुण 34 पोलीस अधिकाऱ्यांचे स्थानांतरण करण्याचे आदेश निर्गमित केले आहे. काही दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील काही अधिकारी इतर जिल्ह्यात स्थानांतरित झाले होते. त्यांच्या जागेवर इतर जिल्ह्यातील अधिकारी रुजु झाले. दिनांक 8 फेब्रुवारी 2023 रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात नव्याने रुजु झालेल्या तसेच जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अधिकाऱ्यांचे स्थानांतरण करून त्यासंबंधी आदेश दिले आहे.
नव्या आदेशानुसार आता नव्याने आलेले अनिल जिट्टावार हे दुर्गापूर पोलीस स्टेशन, आसिफराजा शेख यांची घुग्गुस पोलीस स्टेशन, अमोल काचोरे पोलीस स्टेशन वरोरा, भीमराव कोरेटी सुरक्षा शाखेत नेमणूक करण्यात आली आहे.
आधीपासूनच जिल्ह्यात विविध ठाण्यात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या पुढील प्रमाणे झाल्या आहेत मानवी संसाधन विभाग पोनी सुनीलसिंग पवार यांची पडोली पोलीस निरीक्षक पदी बदली, स्थानिक गुन्हे शाखेचे बाळासाहेब खाडे यांची बदली मानव संसाधन विभाग चंद्रपूर, चंद्रपूर शहर पोनी सुधाकर आंभोरे यांची ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनमध्ये बदली, पडोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांना स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर ची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, भद्रावती पोनी गोपाल भारती यांची नियंत्रण कक्ष येथे बदली, नियंत्रण कक्ष पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांची बदली पोलीस स्टेशन राजुरा, सायबर सेल चे संदीप एकाडे यांची बदली कोरपना पोलीस स्टेशन, घुग्गुस पोलीस स्टेशनचे पोनी बबन पुसाटे यांची नियंत्रण कक्ष येथे बदली, विपीन इंगळे आर्थिक गुन्हे शाखा यांची बदली भद्रावती पोलीस स्टेशन, ब्रह्मपुरी पोलीस निरीक्षक रोशन यादव यांची वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी बदली, मूल पोनी सतिशसिंह राजपूत यांची बदली चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन, नागभीड पोनी राजू मेंढे नियंत्रण कक्ष चंद्रपूर बदली, नियंत्रण कक्ष चंद्रपूर पोनी सुनील परतेकी यांची पोलीस स्टेशन मूल येथे बदली, वरोरा पोनी दीपक खोब्रागडे यांची आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथे बदली, सहायक पोलिस निरीक्षक भद्रावती सुभाष मस्के यांची बदली आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपूर, अजितसिंग देवरे यांना माजरी पोलीस ठाण्याचा कारभार, संजय सिंह घुग्गुस यांची पोलीस अधीक्षक यांच्या वाचकपदी बदली, कोठारी पोलीस स्टेशनचे तुषार चव्हाण यांची सिंदेवाही पोलीस स्टेशनमध्ये बदली, सिंदेवाही योगेश घारे यांची नागभीड पोलीस स्टेशनमध्ये बदली, सपोनि विकास गायकवाड बल्लारपूर यांची बदली कोठारी पोलीस स्टेशनमध्ये स्थानांतर करण्यात आले आहे.