दाताळा येथे श्री साईबाबा देवस्थानाचा सातवा वर्धापन दिन सोहळा

दाताळा येथे श्री साईबाबा देवस्थानाचा सातवा वर्धापन दिन सोहळा

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर, जवळील दाताळा येथे श्री साईबाबा मंदिराच्या निर्मितीला सात वर्षे पूर्ण होत असल्याने मंदिराच्या व्यवस्थापन मंडळाकडून सातवा वर्धापन दिन सोहळा
सोमवार व मंगळवार दिनांक 27 ,28 फेब्रुवारी 2023 ला आयोजित करण्यात आला आहे.
या वर्धापन दिन सोहळ्यात महासंकल्प गणपती पुजन, पुण्याहवाचन, रुद्रहृवण, लक्ष्मीहवण, दुर्गाहवण, इत्यादी पुजा संपन्न होणार आहे. व सायं. ७.०० च्या आरती नंतर सुंदरकांड पाठ संपन्न होणार आहे.
तसेच मंगळवार दि. २८ फेब्रुवारी २०२३ ला पुर्णाहूती नंतर सायं. 0.00 वाजता महाआरती नंतर लगेच महाप्रसादाचे आयोजन केले आहे. व प्रा. शामजी धोपटे व सहकारी यांचे भजन आयोजित केले आहे. या कार्यक्रमात साईभक्ताकडून देणगीदारांकडून अन्नदान स्वीकारल्या जाईल. अन्नदान हे श्रेष्ठ दान!
तरी या होणाऱ्या उत्सवास साई भक्तांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आव्हान संस्थापक अध्यक्ष राजू संभाजी नागरकर श्री साईबाबा देवस्थान दाताळा नवीन चंद्रपूर यांच्याकडून करण्यात आले आहे.