कार्यालय सोडून दुसऱ्या कार्यालयात मांडले जलसंधारण अधिका-याने बस्तान!




कार्यालय सोडून दुसऱ्या कार्यालयात मांडले जलसंधारण अधिका-याने बस्तान!


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
जिल्हा परिषद चंद्रपूर येथील सिंचाई विभाग सब डिव्हिजन गोंडपिपरीचे जलसंधारण अधिकारी श्री नगराळे हे मागील एक वर्षापासून गोंडपिपरी जिल्हा परिषदच्या सिंचाई विभागात जलसंधारण अधिकारी म्हणून बल्लारपूर तालुक्याचे काम पाहतात. मात्र त्यांचा डेरा हा चंद्रपूर पंचायत समितीच्या आवारात असणाऱ्या सब डिव्हिजन गोंडपिंपरी चंद्रपूर कार्यालयात बस्तान मांडून बसले आहेत. शासकीय नियमानुसार यांना घर भाडे, प्रवास भत्ता, असा असून या सर्वांचा दुरुपयोग केल्याचे दिसून येत आहे. त्यांची सेवा देण्याचे कार्य हे गोंडपिपरी कार्यालय असून बल्लारपूर तालुक्यात सिंचाई विभागाचे जलसंधारण अधिकारी म्हणून काम पाहात आहे. त्यांना चंद्रपूर येथील सिंचाई विभागाच्या कार्यालयात बसण्याचा अधिकार आहे का? याकडेही संबंधित अधिकाऱ्याने लक्ष  देण्याची गरज आहे.यांच्या कडे काही चंद्रपूर तालुक्यातील काही गावे  सोपवण्यात आले आहेत.  तालुक्या जिल्हा निधी अंतर्गत सिंचाई विभागाचे जे कामे झाले असून  ते निष्कृष्ट दर्जाचे झाले असल्याची  माहिती आहे. या झालेल्या कामाची चौकशी  करण्यात यावी अशी मागणी होत आहे.