अंबुजा सिमेंट कंपनीतील 10 गावातील जन सुनावणी घ्या - माजी मंत्री विजय वडेट्टीवार मनपाने अमृत योजनेचे पाणी सोडून, विष दिले! जिल्ह्याच्या पालकमंत्राने अशोभनीय भाषण केले, ही अपेक्षा नव्हती- 15 जुलैला फ्री चेक अप कॅन्सर गाडीचे लोकार्पण




अंबुजा सिमेंट कंपनीतील 10 गावातील जन सुनावणी घ्या - माजी मंत्री विजय वडेट्टीवार

मनपाने अमृत योजनेचे पाणी सोडून, विष दिले!

जिल्ह्याच्या पालकमंत्राने अशोभनीय भाषण केले, ही अपेक्षा नव्हती-

15 जुलैला फ्री चेक अप कॅन्सर गाडीचे लोकार्पण


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :- 30 /6/2023
चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर उपरवाही येथील अंबुजा सिमेंट कंपनी ने काही वर्षांपूर्वी दहा गावातील जन सुनावणी रद्द केली होती. त्या गावातील लोकांना अनेक समस्या पासून दूर ठेवून राजकीय हितसंबंध साधून आर्थिक पाठबळ करून या गावांना सुख सुविधेपासून वंचित ठेवण्यात आले. या परिसरातील दहा ग्रामपंचायतीची जन सुनावणी घ्यावी अशी मागणी भारत सरकारकडे केली आहे. जर अंबुजा सिमेंट कंपनीने या गावातील जन सुनावणी घेतली नाही तर राष्ट्रीय काँग्रेस पार्टी तर्फे जन आंदोलन करण्यात येईल अशी माहिती पत्रकार परिषदेतून माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली यावेळी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, माजी शहराध्यक्ष नंदू नागरकर, शामकांत थेरे, काँग्रेसचे पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.

मनपाने अमृत योजनेचे पाणी सोडून, विष दिले

चंद्रपूर महानगरपालिकेत प्रशासनाने शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी अमृत योजनेचा अमलात आणली. शहरातील नागरिकांना अमृत योजनेचे पाणीपुरवठा सोडून विष दिल्याचा घनाघाती आरोप माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला. स्थानिक नागरिकांचा मनपातील माझी नगरसेवकांचा या पाणीपुरवठा कंत्राट देण्यासाठी विरोध असताना सुद्धा मनपा प्रशासनाकडून कंत्राट देण्याचे कटकारस्थान सुरू आहे. अमृत योजनेचे अनेक भागात पाणी येत नसल्याची बोंब असून, या योजनेचे कंत्राट एका खाजगी माणसाला देण्याचे षडयंत्र सुरू आहे. फसवण्याचे काम सुरू करून आपली पाठ थोपटली जात आहे. अमृत योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून अडीचशे कोटीची अमृत योजनेच्या नावाखाली शेन खाणाऱ्याचे लवकरच नाव जाहीर करू. या संदर्भाची चौकशी करण्यासाठी मंत्रालयात संबंधित विभागाला चौकशीचे पत्र देण्यात येत असल्याची माहिती सांगितली. अमृत योजनेच्या मार्फत जनतेला लुटण्याचे काम केले या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेतून सांगण्यात आली.


जिल्ह्याच्या पालकमंत्राने अशोभनीय भाषण केले, ही अपेक्षा नव्हती-  माजी मंत्री विजय वडेट्टीवार

 चंद्रपूर जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीच्या मोदी@9 महाजन संपर्क अभियान निमित्त चंद्रपुरात मोठ्या जाहीर सभेचे  आयोजन केले होते. या सभेमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी  काँग्रेसच्या  भारतीय नेत्यांवर अशोभनीय  भाषण केलं होतं. किमान वरिष्ठ नेत्याच्या मर्यादा राखून पालकमंत्र्याने टीका करणे अशोभनीय होते. ती एका उच्चशिक्षित, विकास पुरुष म्हणणाऱ्या नेत्याकडून अपेक्षित नव्हते. त्यांच्या नेत्यांचे राज्यातील नेतृत्व यांच्याकडे लक्ष नाही. कारण राहुल गांधी  च्या भीतीने  गाडी रुळावर  खाली जाण्याची भीती वाटत असल्यामुळे अशाच प्रकारचे अशोभनीय वकृत्व हे करतात.
   आपल्या जिभेला त्रास होईल असे वक्तव्य पालकमंत्र्याने तरी करू नये. या घाणेरड्या वक्तव्याचा जनतेसह काँग्रेस पार्टीकडून निषेध   केला जाईल.

 राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी हा भारतीय जनता पक्षाचा डीएनए असल्याचे संबोधितले. भारतीय जनता पार्टी ही कधीही ओबीसी च्या मागे राहिली नाही आणि यापुढेही ती ओबीसीचे सोबत राहणार नाही. असा घनघत आरोप माजी मंत्री विजय  वडेट्टीवार यांनी केला.
 राज्यात 35 लाख लोकांचा रोजगार हिरावला गेला. संपवण्याच्या मार्गावर असून ओबीसींना संपवण्याचे काम  भाजपाकडून सुरू आहे. ओबीसीला एक रुपयाही निधी दिला नसून, परदेशी शिष्यवृत्ती दिली नाही. त्यावेळेस विलासराव  देशमुख मुख्यमंत्री असताना 630 स्कॉलरशिप लागू केली होती.  असेही ते म्हणाले.
 आज पर्यंतचा इतिहास आहे ओबीसी साठी भाजपा नाही, भाजपा ओबीसी होऊ शकत नाही! ओबीसीची माथी कोणी भडकवली हे सांगण्याची जरुरत नाही. ते येणाऱ्या 24 मध्ये जनता सांगेल. राज्य सरकार निवडणूक घेणारा घाबरते. या सरकारचे घोषणाच्या पलीकडे काही नाही.
 शासनाचा अनेक फंड पडून असून राज्यात विकास  खोळंबला. अजूनही शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळाले नाही अशी ओरड शेतकऱ्यात आहे. केंद्र सरकारचा सन्मान निधी जसाच्या तसा सरकारकडे आहे.  ते अजूनही शेतकऱ्याला मिळाले नाहीत.  नगरपरिषद, नगरपंचायत यांना तीन वर्षापासून  निधी  बाकी आहे. फक्त घोषणा करणे हे सरकारचे काम असून सर्वसामान्य माणसाला फसवण्याचे काम या सरकारकडून होत आहे असा घनाघतीत आरोप आज झालेल्या पत्रकार परिषदेतून माझी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

 15 जुलैला  फ्री चेक अप कॅन्सर गाडीचे लोकार्पण 
.
 फ्री चेक अप साठी जिल्ह्यातील  जनतेला  मोफत कॅन्सरचा इलाज व्हावा यासाठी माजी मंत्री  विजय  वडेट्टीवर  यांनी आपल्याकडून जिल्ह्यासाठी कॅन्सर सारख्या आजारावर तुरंत उपाय व्हावा यासाठी पंधरा जुलैला  सायंकाळी पाच वाजता गांधी चौकात फ्री चेकअप   कॅन्सर गाडीचे   लोकार्पण करण्यात येत असल्याची माहिती  आज पत्रकार परिषदेतून दिली. सर्व सुविधायुक्त असलेली  ही गाडी  फ्री चेक अप साठी राहणार आहे.  या गाडीतच फर्स्ट ट्रीटमेंट, बॉडी स्कॅनिंग होणार आहे.  संपूर्ण  सोयी संयुक्त कॅन्सर गाडी चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकासाठी उपलब्ध होत आहे. ही गाडी आरोग्य कॅम्प जिथे असतील तिथे पाठवली जाईल. जिल्ह्यात वाढते कॅन्सरचे प्रमाण लक्षात घेता आपण या गाडीची व्यवस्था केल्याची माहिती  वडेट्टीवार यांनी दिली. फर्स्ट स्टेजवर असलेल्या कॅन्सर रुग्णाला, डिटेक्ट होणे या गाडीचा फायदा होईल.