आधार लिंक नसल्याने नागरिकांची ससेहोलपट, 18 वर्षावरील मुला- मुलींना आधार काढणे अपडेट करणे कठीण !Aadhar. chandrapur
काय आहे नेमके कारण ?
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
मागील एक आठवड्यापासून शासनाच्या निर्धारित केलेल्या आधार केंद्रावर लिंक नसल्याने नागरिकांना ससेहोलपट होत आहे. नागरिकांना आधार केंद्रावर येऊन आल्या पावली वापस जावे लागत आहे. सध्या दहावी बारावीचे रिझल्ट लागल्यामुळे विद्यार्थ्यांच्या कागदपत्र बनवण्यासाठी आधार केंद्रावर गर्दी होत आहे. मात्र मागील 15 दिवसापासून शासनाने निर्गमित केलेल्या आधार केंद्रावर लिंकच नसल्याने नागरिकाची गैरसोज होत आहे.
त्यात 18 वर्षावरील मुला मुलींचे आधार काढणे प्रत्येक आधार केंद्रावर लिंक मुळे बंद आहे. पहिले आधार कार्ड अपडेट केले असेल तर अपडेट होतात. परंतु आधार काढले तेव्हापासून एकदाही अपडेट केले नसेल तर आधार कार्डवर लिंक मिळणे कठीण होत आहे.
म्हणून विद्यार्थ्यांना आधार केंद्रावर लवकरात लवकर लिंक उपलब्ध करून द्यावी विद्यार्थ्यांचे कुठलीही गैरसोय होऊ नये अशी मागणी विद्यार्थ्याकडून होत आहे.
शासनाची नवीन आधार अपडेट तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ते सुरू झाल्याशिवाय आधार लिंक सुरू होणार नाही. त्यासाठी अजून किती दिवस लागतील याची माहिती सध्या तरी व्यवस्थापक आधार अपडेटर मंगेश कोरेकर यांच्याकडेही नाही. सध्या शासनाची नवीन आधार लिंक सुरू करणे सुरू असून त्याची पडताळणी सुरू आहे. त्यामुळे सर्व आधार केंद्रावर लिंक बंद आहेत.
भविष्यात सर्व नागरिकांना आधार लिंक साठी ई- केवायसी करणे अनिवार्य आहे. आपला आधार कार्ड केवायसी न झाल्यास शासनाच्या किंवा इतर सुविधा नागरिकांन घेता येणार नाही. त्या सुविधा घेण्यासाठी नागरिकांनी केवायसी करणे अत्यंत गरजेचे आहे.
आपले आधार कार्ड कितीदा अपडेट होऊ शकते!
आधार कार्डवर जन्मतारीख फक्त एकदा बदलता येते.
आधार कार्ड वरील नाव फक्त दोनदा बदलू शकता येते.
आधार कार्ड वरील पत्ता अनेक वेळा बदल करता येतो. आधार कार्ड वरील लिंगाची माहिती एकदा बदलवण्याची सुविधा आहे.
सरकारने आधार कार्ड साठी केवायसी अनिवार्य केली असून नागरिकांनी आपल्या आधार कार्ड वर केवायसी करून घेऊन शासनाने दिलेल्या सर्व सुविधाचा लाभ घेता येथे .अन्यथा आपण भविष्यात सरकारच्या अनेक सुविधा पासून वंचित राहाल .