मीच काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष, पक्षाच्या नेत्यांनी घेतलेली परिषद बदनामीचे षडयंत्र !





मीच काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष, पक्षाच्या नेत्यांनी घेतलेली परिषद बदनामीचे षडयंत्र !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर ग्रामीण जिल्हा काँग्रेस अध्यक्षच्या पदावरून सध्या चंद्रपूर जिल्ह्यात चांगलीच खळबळ माजली आहे. हा वाद इथेच थांबला नाही तर दोन गटाच्या पदाधिकारात प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव विनोद दत्तात्रय यांनी काल पत्रकार परिषद घेऊन प्रकाश देवतळे कडून शिस्तभंग केल्याचा आरोप केलाय. तर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार धोटे असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले. आज त्याच पत्रकार परिषदेचे खंडन करण्यासाठी प्रकाश देवतळे यांनी
मीच काँग्रेसचे अध्यक्ष असून काही पक्ष नेत्यांनी घेतलेली परिषद बदनाम करण्याचा षडयंत्र असून मी या संदर्भात
वरिष्ठ पातळीवर कारवाई प्रक्रियेनुसार शोकास नोटीस
व अब्रू नुस्काणिचा दावा करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेतून दिली. मी पक्षशिस्तीचा बंद केला नाही. वायरल झालेले पत्र हे माध्यमावर आले त्यानंतरच मला माहित झाल्याची माहिती त्यांनी दिली. वायरल झालेले पत्र माध्यमावर आले म्हणजे माध्यम ही चोर आहेत का? असा प्रश्न त्यांनी केला.
ए आय सी सीचे गोपनीय पत्र माध्यमाच्या हाती लागत असेल . म्हणून मी चोर आहे का? असा प्रश्न उपस्थित केला.
काही दिवसापूर्वी जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी भाजप सोबत कृषी बाजार समिती च्या निवडणुकीत हात मिळवली केल्यामुळे त्यांना जिल्हा अध्यक्ष पदावरून पदमुक्त करण्यात आले होते.
चंद्रपूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रकाश देवतळे यांना पदमुक्त करताना पक्षश्रेष्ठींच्या आदेशाची अवहेलना केल्याचा आरोप पक्षाच्याच काही कार्यकर्त्यांनी केला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी पक्ष संघटनेत स्वतःचा दबदबा निर्माण करण्याच्या प्रयत्नात पक्षातील लोकशाही मूल्यांकडे डोळेझाक केली आहे. सोबतच त्यांनी या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, काँग्रेस पक्षात ज्या कुणावर कारवाई केली जाते, आधी त्याची बाजू ऐकून घेतली जाते. त्यासाठी त्याला कारणे दाखवा नोटीस बजावली जाते. त्यानंतर शिस्तपालन समिती योग्य तो निर्णय घेत असते. परंतु देवतळे यांच्या प्रकरणात या प्रक्रियेचे पालन झालेले नाही. प्रदेशाध्यक्षांनी त्यांना थेट पदमुक्त केले. ही बाब काँग्रेस थेट पदमुक्त केले. ही बाब काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्या लक्षात आल्यानंतर या पदमुक्तीला स्थगिती देण्यात आली. परंतु या आदेशाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप आता होत आहे.

मला जिल्हा अध्यक्ष पदावरून पदमुक्त केल्याचे पत्र मी काँग्रेसचे वरिष्ठ नेते खरखे साहेब त्यांच्याकडे लेखणी तक्रारीने कपिल केली होती. त्यासाठी मी दिल्लीत वीस दिवस या सर्व प्रक्रियेस उपस्थित होतो.
चोरी गेलेल्या पत्रासंदर्भात मी कुठलीही भूमिका मांडली नाही. माझ्यावर आरोप झाले. आतापर्यंत कुठलाही शोकास आला नाही, कुठलाही शोकास आला नाही. पक्षातील अंतर्गत मामला समजून मला पत्र देणे अनिवार्य असताना कुठलेही असे झाले नाही.
फुकट दुसऱ्या पक्षातून आलेले, मुंबई दिल्लीत राहून तक्रार केल्याने आरोप सिद्ध होत नाही. असा आरोप विनोद दत्तात्रय यांच्यावर केला.
पक्षाच्या वाढीसाठी अहो रात्र कार्य करून कृषी उत्पन्न बाजार समिती च्या निवडणुकीत 116 संचालक दिले. ग्रामीण जिल्हा अध्यक्ष म्हणून सर्व निवडणुकीत सर्व परीने निवडणुकीस जाऊन आघाडीत असलेल्या उमेदवारांना निवडून आणण्याचे काम आम्ही केले. त्यामुळे पक्ष बळकट आहे . या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, गजानन बुटले, आणि काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.