राज्याचे विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांच्या निवडी बद्दल चंद्रपुरात जल्लोष
राज्याचे विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांच्या निवडी बद्दल चंद्रपुरात जल्लोष


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
अ जित पवारांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त झाले होते. या जागेवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडूनही दावा करण्यात येत होता. नियमानुसार, विधानसभेत ज्याचे सर्वाधिक सदस्य त्याचा विरोधी पक्षनेता असं सूत्र आहे.

त्यानुसार, महाविकास आघाडीत आता सर्वाधिक सदस्य काँग्रेसचे असल्याने विरोधी पक्षनेते पदही काँग्रेसला देण्यात आले आहे. विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्षनेता असतील असा काँग्रेसने निर्णय घेतला आहे. विधान परिषदेतील आमदार सत्यजित तांबे यांनी याबाबत ट्वीट करून ही माहिती दिली आहे.
यापूर्वी सुद्धा विजय वडेट्टीवार विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी राज्यात काम केले. त्या कार्याला वरिष्ठांनी विश्वास दाखवून पुन्हा विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड करण्यात आली. त्या आनंदोत्सवासाठी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अंतर्गत गांधी चौक येथे फटाके फोडून आनंद जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष नंदू नागरकर, माजी नगरसेवक प्रवीण पडवेकर, माजी नगरसेवक वसंत देशमुख, राजेश अडूळ, विनोद संकेत,मोहन डोंगरे, सचिन कत्याल, सिडाम,नळे,... यास काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.