चंद्रपुरातील कायमची पुराची समस्या !! घरांमध्ये पूर की नदीत घरे ?chandrapur




चंद्रपुरातील कायमची पुराची समस्या !!
घरांमध्ये पूर की नदीत घरे ?

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
पावसाळा सुरू झाला की, दरवर्षी  चंद्रपुरातील 'या' 'या'भागात नेहमीच पुराच्या पाण्याच्या विळख्यात घरे डुबली जातात. चंद्रपुरातील  कायमची पूर पिढीची समस्या हे असं आणखी किती वर्षे चालणार ? 
         चंद्रपूरला पुराचा वेढा , चंद्रपूरात आला पूर अनेक वसत्यांत शिरले पाणी, नागरिकांच्या घरात पुराचे पाणी अशा दरवर्षी वर्तमानपत्रातील बातम्या  वाचू वाचू  चंद्रपूरकरांचे  नेत्र दिपले आहेत. मात्र याकडे प्रशासनाने कधीही गांभीर्याने घेतले नाही.  पुरासंदर्भाची व्यवस्थाही केली नाही. मुळात चंद्रपुरात पूर येण्याचे कारणही समोर असताना  त्याचे योग्य नियोजन  जिल्हा प्रशासन, मनपा प्रशासनाला  करणे अगत्याचे असते.तेही केले जात नाही!

मनपाची डुप्टी भुमिका! 
रेड कार्पेट एरियात कोणीही प्लाट घेवु नये, घरे बांधून नये असे फलक लावले जाते. मात्र मनपा प्रशासन त्यांना घरटॉक्स पावती देतो. लाईट, नळ पाणीपुरवठा सर्व सोयी उपलब्ध करून देतात, तर मग ही मनपाची डुप्टी भुमिका नाही का? 


 कारण ज्या परिसरात नदीचे  घरात पाणी घुसून  घरे डुबली जातात, त्या मागचे नेमके कारण काय? कारण मुळात म्हणजे 'घरांमध्ये पूर की नदीत घरे'  हा बेसिकली प्रश्न  सर्वसामान्य जनतेला पडतो!  नदी काठावरील रेड झोन एरियात अनेक वस्त्या बसल्या आहेत. नागरिकांनी थेट नदीपात्रातच, तिथे त्यांनी आधी झोपडी बांधल्या,  मग हळूहळू  करत झोपड्यांची घरी झाली, नंतर गेल्या दहा-बारा वर्षात या रेड झोन एरियात  प्लॉट पाडून    दलालानी  गोरख धंदा सुरू केला.हळूहळू बिल्डर लाॅबी ने याच नदीपात्रात मोठमोठ्या सदनिका ( फ्लॅट स्किम ) उभ्या केल्या. आत्ता आत्ता अगदी कोरोना काळात पठाणपूरा गेट च्या बाहेर जगन्नाथ मठाच्या रोडवर सुद्धा थेट नदीपात्रात प्लाॅट पाडून आताही विक्री सुरु आहे. यामुळेच मग नदीचे पात्रच घरांमध्ये परावर्तीत झाले आणि लोक म्हणतात घरात पाणी शिरले. 
आणि याचाच फटका चंद्रपूर शहरातील नागरिकासह आजूबाजूतील ग्रामीण भागातील जनतेलाही पडतो. हजारो एकतर शेती या पुऱ्याच्या विळख्यात  वाहून जाते. घरात पाणी शिरल्यामुळे हजारो नागरिकांना प्रशासनाला त्याची नुकसान भरपाई  करून द्यावी लागते.
.  मला काही प्रश्न पडलेत ते असे की , नदी म्हण्टल की ब्ल्यू लाईन , रेड लाईन , पूर प्रवण क्षेत्र हे सगळं आलंच. तर चंद्रपूरात असे काही ब्ल्यू लाईन , रेड लाईन , पूर प्रवण क्षेत्र आहे का ? असल्यास या भागाचे काही नियम ईथे लागू होतात का ? त्यावर काही अंमलबजावणी केली जाते का ? नदीपात्रात प्लाॅट पाडून विक्री ला परवानगी कशी मिळते ? बिल्डर लाॅबी चे सदनिकांचे ( अपार्टमेंट,  फ्लॅट स्किम ) चे नकाशे कसे सॅक्शन होतात ? गेल्या पाच सात वर्षांत शहराच्या आजूबाजूला असलेल्या क्षेत्रात नदीच्या पात्रातील घरात अचानक कशी काय वाढ झालीय ? बर ज्यांच्या या झोपड्या / घर आहेत तेच लोक तीथे राहतात का की त्यात भाडेकरू राहतात ? हे लोक कुठून आलीत ? यांची नोंद महापालिका / जिल्हा प्रशासन/ पोलीस विभागाकडे आहे का ? महानगरपालिका / जिल्हा प्रशासनाकडे चंद्रपूर शहर विकासाच्या दृष्टिकोनातून पुढील 20/25 वर्षाच्या अनुषंगाने काही नियोजन केलेले आहे का ? त्याची काही अंमलबजावणी होत आहे का ? 
     खरं सांगायच तर  चंद्रपूर ला आता गो.रा.खैरनार, तुकाराम मुंढे,  अब्दुल रहमान यांच्या सारख्या प्रामाणिक, कार्यक्षम अधिकाऱ्यांची गरज आहे. तर आणि तरच चंद्रपूर चं काही भलं होऊ शकतं. किंवा मग कोणताही राजकीय पक्ष विरहित असा केवळ चंद्रपूरकरांचा एक प्रामाणिक दबाव गट निर्माण होणे आवश्यक आहे जो फक्त शहर विकासाच्या दृष्टिकोनातून विचार करेल आणि प्रत्यक्ष काम करेल. 
           कोणताही राजकीय नेता या विषयाला हात लावणार नाही कारण त्यांना शहर विकासापेक्षा तेथील व्होट बँक महत्वाची वाटते. पूर आला शासनाचे पैसे वाटून दिले की यांच काम संपतं ,मतं पक्की होतात .मग पुन्हा पुढील वर्षी पुर आला की हे पुन्हा मदत मागायला तयार.... 
         सर्व करदाते हे कर यासाठी देतात की रस्ते , नाल्या , स्ट्रीट लाईट ,पुल , वाहतूक व दळणवळणाच्या सोई , आरोग्य आणि शिक्षण हे योग्य मिळावे. पण जर या पैशाचा वापर हे चुकीच्या पद्धतीने नदीपात्रात घर बांधून राहणाऱ्या नागरीकांना वाटण्यात उधळण्यात येत असतील तर आता हे धंदे बंद व्हायला हवेत कायमचे. संपूर्ण जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, पोलीस विभाग या लोकांसाठी झटतो जे चुकीचे कामं करतात ??? यांच्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन राबवा , यांना राहण्याची जेवणाखाण्याची , आरोग्य तपासनीची सगळी व्यवस्था करा. दर दोन चार वर्षात पूर आला की हेच सगळं सातत्याने होत चाललंय.  हे असंच आणखीन किती वर्ष चालणार ??? 
         एक चांगला प्रामाणिक दबावगट तयार करने , यातून प्रशासनावर अंकुश आणने आणि हे असे चुकीचे कामं बंद करून शहर विकासाच्या दृष्टिकोनातून प्रामाणिक प्रयत्न करने खूप आवश्यक आहे. नदीपात्राची स्वच्छता आणि खोलीकरण हा स्वतंत्र मुद्दा घेऊन त्यावर निट काम करणे हे आताच खूप आवश्यक आहे. अन्यथा येणारी पिढी आपल्याला कधीही माफ करणार नाही. यावर सखोल चिंतन व्हावे , विचारविमर्श व्हावा आणि यातून काहीतरी चांगल निघावं जे समस्त चंद्रपूरकरांसाठी चांगल राहील  असे प्रखळ मत  समाजसेवक श्याम हेडाऊ यांनी मांडले.