आठव्या दिवशीही रवींद्र टोंगेचे उपोषण सुरूच, पालकमंत्र्याची चर्चा ठरली निष्फळ





आठव्या दिवशीही रवींद्र टोंगेचे उपोषण सुरूच, पालकमंत्र्याची चर्चा ठरली निष्फळ

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
मागील आठ दिवसापासून चंद्रपूर जिल्हा कार्यालयासमोर ओबीसीच्या विविध मागण्या घेऊन रवींद्र टोंगे उपोषणाला बसले आहेत. ओबीसी समाजातुन मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, राज्यात ओबीसी चे वस्तीगृह सुरू करावे. स्वाआधार योजना सुरू करावी. अशा 12 मागण्या घेऊन उपोषणाला बसले आहेत. त्या आंदोलनाची दखल घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन चर्चा केली. त्यात त्यांनी ओबीसी वस्तीगृह, स्व आधार योजना, आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी जाहीर केल्याप्रमाणे ओबीसी प्रवर्गात कुठल्याही प्रकारचे मराठा समाजाला आरक्षण दिल्या जाणार नाही. अशी माहिती उपोषण करताना दिली. व उपोषणकर्त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. मंत्रालयात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्रिमंडळाच्या सदस्य सोबत ओबीसी शिष्ट मंडळाची बैठक घेऊन लवकरच बाकी निर्णय घेऊ असे तोंडी आश्वासन दिले. परंतु ते उपोषण करताना मान्य नसून ते आपल्या मागण्यावर ठाम असल्याचे दिसून आले. उपोषणकर्त्याचे म्हणणे आहे की जरांगे पाटलांना मराठी समाजाच्या मागण्या संदर्भात काय लिखित दिले ते आम्हाला कळवा. शिष्टमंडळासोबत चर्चा झाल्यावर लिखित स्वरूपात शासनाने ओबीसी समाजाला द्यावे. अन्यथा अन्नत्याग आंदोलन सुरूच राहील. या चर्चेवर निर्णय न झाल्याने पालकमंत्र्याची चर्चा निष्फळ ठरली.
आंदोलन करते म्हणाले की, हा प्रश्न चंद्रपूरकरांचा नसून संपूर्ण महाराष्ट्राचा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात वस्तीगृह, स्वाधार केंद्र, आणि मराठा समाजाला उपोषण सोडण्यासाठी काय लिखित दिले, हे त्यांनी द्यावे अशी मागणी लावून धरली. यावर पालकमंत्र्यांनी वस्तीगृह, व आधार केंद्र, त्या जीआर आणि त्या जीआर मध्ये असलेला व्यवसाय शब्द हा एक महिन्यात काढल्या जाईल अशी ग्वाही दिली. त्यावर उपोषणकर्त्यांनी प्रशासनाची, सरकारची बैठक ओबीसी शिष्टमंडळाला सोबत घेऊन चर्चा करावी. तरच उपोषण सोडल्या जाईल. नाहीतर आम्ही आपल्या निर्णयावर ठाम असून उपोषण सुरूच राहील त्या संदर्भात ओबीसी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करू आपणास कळवतो असे म्हटल्याने चर्चा निष्पर ठरली.