गडपिपरी आंबोली रस्त्यावर वाघाचे दर्शन, नागरिकात भीतीचे वातावरण




गडपिपरी आंबोली रस्त्यावर वाघाचे दर्शन,
नागरिकात भीतीचे वातावरण

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर (चिमूर)
भिशी शंकरपूर रोडवर असलेल्या गडपिपरी चौरस्ता लावारी मुख्य रस्त्यावर वाघाचे दर्शन झाल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. या परिसरात सूत्राच्या माहितीनुसार तीन चार वाघ असून ते या परिसरात भ्रमण करीत असतात.
या परिसरात गावे जंगल व्याप्त गावालगतच्या पोरांना शाळेत जाण्यासाठी आंबोली भिशीला जावे लागते. रस्त्यालगत जंगल असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक शेतकऱ्यांची शेती ही जंगलाला लागून असल्याने परिसरात वाघ असल्याने सध्या शेतीकडे भटकणे दुर्लभ झाले आहे. त्वरित वन विभागाने वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.