शहरात अमृत योजना!... तरी पाण्याच्या टँकरने होतो पाणीपुरवठा! अमृतचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास लागणार दोन वर्ष ! शहरात पाणीपुरवठा व्यवस्थित नसल्याने नागरिकांची ओरड !





शहरात अमृत योजना!... तरी पाण्याच्या टँकरने होतो पाणीपुरवठा!

अमृतचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास लागणार दोन वर्ष !


शहरात पाणीपुरवठा व्यवस्थित नसल्याने नागरिकांची ओरड !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :
चंद्रपूर महानगरपालिका तर्फे शहरामध्ये अमृत योजनेच्या माध्यमातून शहरात सर्व नळ जोडणी जलमापक पाणीपुरवठा करण्याचे सुरू आहे. मात्र पाच वर्षे होऊन सुद्धा शहरात कुठेही पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. अनेक भागात अजूनही पाईपलाईनचे काम सुरूच आहेत. जलमापक बसवण्याच्या यंत्रणेत अजूनही पाहिजे तशी सुव्यवस्था झालेली नाही. या संदर्भात महानगरपालिकेचे उप अभियंता बोरीकर यांना या संदर्भात माहिती घेतली असता. ते म्हणाले की, चंद्रपूर शहरातला पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी आणखी दोन वर्ष लागू शकतात.
आतापर्यंत शहरात ६०००० लोकांना नळ जोडणी करण्यात आली आहे. १५ हजार मीटर लावणे बाकी आहे. दर दिवसाला चाळीस दशलक्ष मिलीमीटर पाणीपुरवठा करण्यात येतो. सध्या सी टी पी एस तर्फे ३५ दशलक्ष पुरवठा पाणीपुरवठा केला जातो.
बाकी इराई नदीवरून शहरात पाणीपुरवठा करण्यात येत आहे. शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी एक ते दीड तास पाणीपुरवठा केला जात आहे. नागरिकांना नळ जोडणी करण्यात आली आहे त्यांना ई मिटर लावण्यात आले. बिल त्या मीटर रीडिंग चे बिल मार्चपासून देण्यात येणार असल्याचे सांगितले
सर्व शहरात पाणीपुरवठा करण्याचे कंत्राट साई आय टी कंपनीला देण्यात आले आहे. कंत्राटदराच्या हलगर्जीपणामुळे अनेक वार्डामध्ये अजूनही पाईपलाईन नळ जोडणी झालेली नाही. ब-याच वार्डामध्ये जुनी पाईपलाईन सुरू असून त्यातही पाणी नागरिकांना सुरळीत मिळत नाही. नवीन मीटरच्या युनिट मागे महानगर पाणी करांचे दर नागरिकासाठी वेगवेगळ्या आकारणीत दिले आहे एक ते पंचवीस लिटर मध्ये बारा रुपये युनिट, २६ ते ४० लिटर मागे पंधरा रुपये युनिट, ४० पेक्षा जास्त लिटर मागे अठरा युनिट दराने पाणी वापरल्यास किंवा न वापरल्यास फक्त सेवाशुल्क म्हणून १२५ रुपये आकारण्यात येईल. घरगुती युनिट बारा रुपये, बिगर घरगुती २४ रुपये, संस्थात्मक २४ रुपये, व्यावसायिक ३६ रुपये , औद्योगिक ८४ रुपये, याप्रमाणे पाणी कर दर मनपाने आकारले आहेत. सर्व कर जलमापाकाची रीडिंग घेण्यात आल्यावर नागरिकांना हे दर लागू होणार आहेत. नळ धारकांना दर तीन महिन्याला पाणी कराची देयके आकारण्यात येतील.
योजनेच्या पुरवठा करण्यासाठी मनपा करून ३से४५ कोटी वर रुपयांचा खर्च करण्यात आला. परंतु नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने. शहरातील पाणीपुरवठा योजना सपसेल फेल झाली अशी ओरड होत आहे. अनेक ठिकाणी लावलेले मीटर नागरिकांनी स्वतः काढून घेतले आहे. नवीन पाईपलाईन टाकलेल्या नळ योजनेला पाण्याचा वेग नसल्याने अनेक नागरिकांना व्यवस्थित पाणी मिळत नाही. अमृत योजनेच्या पाईप लाईन साठी शहरातील मुख्य मार्ग खोदून ठेवल्याने रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे. नियोजन शून्य व्यवस्थेचा हा दुष्परिणाम जाणवतो आहे.
चंद्रपूर शहरात योजना ३से४५ कोटीची दोन टप्प्यात सुरू करण्यात आली.  त्यात २से५० कोटी इरई डॅम पासून शहरात पाईप लाईन टाकणे. दुसरा होता धानोरा ब्राँडेज मधून दीडशे कोटी ची पाईपलाईन टाकणे.
 वॉटर रीजर्वेशन आपल्याकडे पाहिजे म्हणजेच पाण्याचा सोर्स असणारे  एरीकेशन डिपार्टमेंट ला पाणी देण्याचा अधिकार,  इराई धरण हे  सिटी पी एस च्या मालकीचे  असल्याने मनपाला पाण्यासाठी  परवानगी घ्यावी लागत होती.
 परंतु ती धानोरा नदीवरील लाईन रद्द करण्यात आली .याठिकाणी खांबळ्यापासून तर हळस्ती पर्यंत विविध कंपन्या आणि अनेक गावांना पाणीपुरवठा  होत असल्याने त्या नदीला पूर्ण चुरचुर करून पुसून टाकल्याने तोही प्रकल्प रद् करण्यात आला.  शहरात सर्व घरात दोन टप्प्यात पाईप लाईन टाकायची होती. कुठेही पाईपलाईन टाकली नाही. जुन्याच पाईप वर नवीन पाईपलाईन जोडल्या गेली. कुठेही मीटर सुरू  झाले नाहीत. झाले तर ती काढून टाकण्यात आले.
 पहिला टप्पा अडीचशे कोटीचा पूर्ण झालेला नाही जुन्यास पाईप लाईन वर जोडण्यात आलेल्या लाईनला अमृत योजनेच्या कंत्राद्वाराने लाईन जोडणी टाकली. २४ तास नागरिकांना पाणीपुरवठा व्हावा प्रत्येक  नागरिकामागे दीडशे लिटर पाणी याप्रमाणे एका कुटुंबाला सहाशे लिटर पाणी दर दिवसाला मिळायला हवे. पाणी वरच्या मजल्यावर बारा  फुटापर्यंत वर जायला पाहिजे. ते होत नाही. शहरात जवळपास ८० हजार घरे आहेत. मनपाच्या म्हणण्यानुसार ६०००० घरांना  कनेक्शन दिले गेले आहेत. त्यात पुरवठा होत नाही. १५००० कनेक्शन बाकी आहेत. अमृत ची परिपूर्ण योजना पूर्ण न झाल्यामुळे शहरात दरवर्षी   चार ते पाच हजार बोरिंग खोदल्या जात आहेत. अंदाजे शहरामध्ये जवळपास ४०००० च्या वर बोरिंग खोदल्या गेल्या आहेत. भूगर्भ शास्त्रानुसार जमिनीत पाणी राहील की नाही याची शंका निर्माण झाली आहे. पाणी भूगर्भात  भू वैज्ञानिक  विभागाकडून ६० फुटाच्या खाली खोदकाम करता येत नाही. परंतु शहरात बोरिंग होताना सर्व नियम धाब्यावर बसवून दीडशे फुटाच्या वर बोरिंग खोदल्या जातात. एवढे असूनही अमृत योजना नावापुरतीच आहे काय? कारण शहरात रोज ४० ते ५० टँकर द्वारे पाणीपुरवठा शहरात केला जातो. घरात याप्रमाणे पाणीपुरवठा केला जात असेल तर त्या अमृत योजनेचे काय? ग्रामीण भागामध्ये जल जीवन मिशन योजने अंतर्गत ग्रामीण भागात पाणीपुरवठा योजना सुरू आहे. तिथे पाणी टँकर पोहोचल्या जात नाही. शहरात मात्र  सर्रास टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे शहरातील करोडो रुपयाची लागत लावलेली अमृत योजना   सबसेल फेल ठरली गेल्याचे कथन माजी नगरसेवक संजय वैद्य यांनी दिनचर्याला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.