आ. किशोर जोरगेवारांना 200 युनिट विज बिल माफीचे भोला मडावी यांचे खुले पत्र!
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणास नम्र विनंती करण्यात येत आहे की,
विधानसभा २०१९ च्या निवडणुकीत जेव्हा आपण उमेदवार होता तेव्हा अनेक पक्षानी आपणास तिकिटीसाठी तात्कळत ठेवले व तुम्हाला अपेक्षित पक्षाने तर तुमची गय सुद्धा केली नाही. परिणामी आपण अपक्ष उमेदवार म्हणून लढण्याचे ठरविले व मोठ्या प्रमाणात जिंकून सुद्धा आले कारण चंद्रपूरच्या जनतेने स्थानिक उमेदवार म्हणून तुमच्यावर विश्वास ठेवला व फुलांचा वर्षावं स्वरूपात मताची उधळण केली.आणी त्यातच तुमची 200 युनिट विज बिल माफीची घोषणा ही फार आकर्षित करणारी होती.
निवडून आल्यानंतर आपण बरेचदा विधानसभेत 200 युनिट विज बिल माफीचा प्रश्न उचलला.परंतु आपल्या भूमिकेला घरातूनच म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील पालकमंत्री व इतर आमदार यांनी साथ न दिल्यामुळे हा मुद्दा दखलपात्र होऊ शकला नाही.
म्हणून तुम्ही कधी ह्या मंचावर तर कधी त्या मंचावर दिसू लागले तरी आम्ही तुमच्या डबल ढोलकी धोरणाचा कधीही विरोध केला नाही.अशात आपण गुवाहाटी येथे गेले तरी आम्ही म्हटलं की,चलता है,चलणे दो ! परंतु असं सगळं चालत असताना हळूहळू 200 युनिटचा प्रश्न आपण सैल केला.व अशात लोकसभा 2024 च्या निवडणुकीत नाराज गुरु शिष्य नाटकला खतपानी घालत अखेर गुरूला थेट समर्थन दिले. इथून आता तुमच्या भूमिकेवर संशय येतो.
कारण तुमच्या गुरुचा विरोध तुम्हीच केला.काही कार्यकर्त्याला सुद्धा मुभा दिली आणी अचानक नाराजी सोडून गुरु सोबत मांडीला मांडी लावली. म्हणून आता तुम्ही जनतेच्या विश्वासावर ठाम रहाल याबद्दल जनता संभ्रमात आहे.त्याचे दुसरे कारण असेही आहे की,संपूर्ण देशात मोदी विरुद्ध लाट आहे व लोकशाही विरुद्ध हुकूमशाही अशी ही निवडणूक बघितली जात असताना आपण हुकुमाशाहिला साथ दिली म्हणून आपण आता 200 युनिट काय कुठलीच लोकशाहिवादी भूमिका घेणार नाही.व परिणामी येत्या विधानसभेत भाजप पक्ष प्रवेश सुद्धा कराल अशी जनतेत चर्चा सुरु झाली म्हणून तुमच्यावर जनतेने दाखविलेल्या विश्वासाला तुम्ही तिलांजली दिली असे जनतेने का म्हणून गृहीत धरू नये? हा एक मोठा प्रश्न आहे.?
तरीदेखील तुम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे असे जर तुम्हाला सिद्ध करायचे असेल तर तुम्ही आता राज्य व केंद्र या दोघांच्याही प्रस्थापीत सरकार मध्ये हाथ मिळविणी केल्याने दिला शब्द पूर्ण करा.व चंद्रपूर करांची 200 युनिट विज बिल माफी येत्या विधानसभा निवडणुकीच्या आधी पूर्ण करा हिच ह्या खुल्या पत्राद्वारे भोला संभाजी मडावी यांनी मागणी केली आहे.