चंद्रपुरात दि.29 ,30 जूनला ग्रंथालय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन




चंद्रपुरात दि.29 ,30 जूनला ग्रंथालय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन

दिनचर्या न्युज :-
चंद्रपुर- स्व. डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार रात्रपाळी महाविद्यालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, चंद्रपुर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि.२९ जुन २०२४ व रविवार, दि. ३० जून, २०२४ रोजी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय, रामाळा तलाव रोड, चंद्रपुर येथील सभागृहात दोन दिवसीय ग्रंथालयाचे राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे.
या राष्ट्रीय कार्यशाळेचे ऊ‌द्घाटन नामदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार, मंत्री, बने व सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय व पालकमंत्री, चंद्रपुर जिल्हा यांचे शुभहस्ते शनिवार, दि.२९ जुन २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता होतं असून, मा. श्री. हंसराज अहिर, अध्यक्ष, राष्ट्रीय मागासवर्ग आयोग, भारत सरकार, नामदार श्री. विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र विधानसभा, खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर, खासदार श्री. नामदेव किरसान, विधान परिषद सदस्य श्री. रामदास आंबटकर, आमदार श्री. अभिजित बंजारी, आमदार श्री. सुधाकर अडबाले, विधानसभा सदस्य श्री. किर्तीकुमार भांगडीया, आमदार श्री. सुभाष धोटे, आमदार श्री. किशोर जोरगेवार, ग्रंथालय संचालक श्री. अशोक गाडेकर, राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाताचे महानिदेशक श्री. बी. व्ही. शर्मा, श्री. जितेंद्र रामगांवकर, चिफ कंझरवेटर ऑफ फॉरेस्ट, श्री. दिपांजन चटर्जी, प्रोजेक्ट ऑफिसर, नॅशनल मिशन ऑन लायब्ररीज, श्री. अनिल बोरगमवार, माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ, श्री. एस. डी. मंगलपल्ली, सहाय्यक ग्रंथालय संचालक, नागपूर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
कन्यका सेवा समितीचे सचिव श्री. राजेश्वर सुरावार, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राहतील. दोन दिवस चालणा-या राष्ट्रीय कार्यशाळेचे डॉ. एस. बी. किशोर, प्रा. संजय रामगीरवार, डॉ. संजय भूत्तेमवार, डॉ. संजय साबळे, डॉ. शालिनी लिहितकर, प्रा. नरेश आंबिलकर, प्रा. डॉ. अशोक माथनकर, प्रा. पुर्णिमा गॅब्रीयल, प्रा. अलका तामगडे आदी विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेस ग्रंथपालांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजन समितीचे प्रा. श्री. संतोष शिंदे, प्र. प्राचार्य, स्व. डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार रात्रपाळी महाविद्यालय तसेच, श्री. रत्नाकर नलावडे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी, श्री. राजीव गोलीवार, कोषाध्यक्ष, श्यामाप्रसाद मुखर्जी सार्व. बाचनालय व श्री. नरेश काळे, निर्गम सहाय्यक, जिल्हा
ग्रंथालय अधिकारी कार्यालय, चंद्रपुर यांनी केलेले आहे. सदर कार्यशाळेमध्ये ग्रंथालय अंकीयकरण (डिजिटायझेशन) आवश्यकता, डिजीटल साधनांचे संरक्षण, ग्रंथालय अनुदान व्यवस्थापन प्रणाली, ग्रंथाचे संरक्षण, जतन व बांधणी, ग्रंथालय संगणकीकरणाची आवश्यकता यांसारख्या विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ग्रंथालय क्षेत्रातील नवनवीन, आधुनिक संकल्पनांची माहिती उपयोजकांना / वाचकांना करून देणे यांसारख्या विषयावरही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अशी माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेतून देण्यात आली.