विविध उपक्रमांचा जनसेवक - धनंजय साळवे


विविध उपक्रमांचा जनसेवक - धनंजय साळवे


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर व बल्लारपूर पंचायत समिती येथे गट विकास अधिकारी तथा प्रशासक धनंजय साळवे यांनी चक्क कवी,, साहित्यिक, लेखन या उपक्रमाची जोड धरून ' माजी वसुंधरा' गावागावात पोहोचवावी असे
प्रशासकीय सेवेत जनसेवकाचे ध्येय पुढे नेण्याचे मानस ठेवून शासकीय सेवेत विविध उपक्रमांचा ठसा ठेवून
काम करताना वेगळेच आनंद मिळत असल्याचे दिनचर्या कडे साधलेला संवाद.
सदैव जनसंपर्कात राहणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांमुळे विविध योजनांची अंमलबजावणी करण्यास मोठी मदत होते.चंद्रपूर पंचायत समितीमध्ये विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाची जाडे मुळे रोवण्याची या जनसेवकाने ध्येय पुढे ठेवून जनजागृती कशी करता येईल याचे मानस ठेवून
वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करून आज चंद्रपूर पंचायत समिती आय. एस. ओ. मानांकित आहे. विभागस्तरीय यशवंत पंचायत राज अभियान अंतर्गत पुरस्कारप्राप्त मिळाला. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनात लोकाभिमुख विविध उपक्रम राबविण्यात अग्रेसर आहे. योजनांची अंमलबजावणी करण्यापासून रक्तदान शिबिर ते ज्ञानभिंती उभारण्यापर्यत उपक्रमांची विविधता आहे. 'माझी वसुंधरा अभियान'साठी प्रतिभावंत कवींचे आशयसंपन्न कवी संमेलन नुकतेच पार पाडले. या माध्यमातून गावागावात 'माझी वसुंधरा' पोहोचण्याचे ध्येय प्रशासनाने हाती घेतली पाहिजे.
राजकीय ,सामाजिक याची जोड होतीच पण शासकीय सेवेत आल्यानंतर सर्व द्विगुणीत करण्याची संधी मिळाली.
कोरपना, गोंडपिपरी, चिमूर, पोंभुर्णा व गडचिरोलीत कार्यरत असताना शासकीय योजना लोकांपर्यंत नेण्यासाठी साहित्य व कवी संमेलनांचा खुबीने वापर केला. पोंभुर्णा पंचायत समितीत फिनिक्स साहित्य मंचच्या सहकार्याने राज्यस्तरीय साहित्य संमेलन घेऊ शकलो. शेवटी लोकजीवन समृद्ध व्हावे, हाच त्यामागे हेतू आहे.
विविध कामानिमित्त शेकडो नागरिक कार्यालयात येतात. त्यांच्या वैयक्तिक वा सार्वजनिक समस्या ऐकून सोडविण्याचा माझा कटाक्ष असतो. खरे तर या लोकसंपर्कातच माझ्या लेखनाची बीजे दडली आहेत. त्यामुळे लोकांच्या प्रबोधनासाठी लिहीत असतो.
'अजून मी हरलो नाही' या काव्यसंग्रहानंतर पुढे काय?
- मित्र नरेशकुमार बोरीकर यांच्या प्रेरणेतून माझा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. वाचकांनी उत्तम प्रतिसाद दिल्याने मला बळ मिळाले, 'उरी हुंदका दाटतो, अभिमानही वाटतो, स्वप्नातही मी गड्यांनो माझ्या गावाला भेटत...' या ओळी माझ्या गावाची
आठवण करून देतात. 'अजून मी हरलो नाही, अजून मी सरलो नाही, निथळणारा घाम सांगेल वाट वाकडी धरलो नाही... अशा ओळी माझ्या कष्टकरी शेतकरी बांधवांसाठी लिहिल्या. भविष्यात 'शासकीय काम आणि जनतेचे प्रश्न' या पैलूंवर संग्रह प्रकाशित करण्याचा मानस आहे.
बळीराजासाठी विशेष योजना ?
- शेतकऱ्यांचा आर्थिक व सामाजिक स्तर
उंचावण्यासाठी अनेक योजना सुरू आहेत. सिंचन विहीर, शेतमाल संरक्षणासाठी ताडपत्री, वन्यप्राणी व पिकांच्या संरक्षणार्थ काटेरी तारेचे वाटप केले. जमिनीचा पोत सुधारण्यास सेंद्रिय खत वापर करण्यासाठी पंचायत समितीकडून प्रचार व प्रसार सुरू आहे. पंचायत समिती सेसफंड अंतर्गत यंदा ७५ ९० टक्के अनुदानावर सौर कुंपण योजना राबविण्यात येत आहे. चंद्रपूर व बल्लारपूर पंचायत समितीचे अधिकारी बळीराजाच्या प्रगतीसाठी विशेष लक्ष देत आहेत.
माझी शाळा सुंदर शाळा या अभिनया अंतर्गत
चंद्रपूर पंचायत समितीअंतर्गत २१ शाळा निपुण घोषित झाल्या.-तिसरीतील १०० टक्के विद्यार्थ्यांना मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान व्हावे आणि तिसरीपुढे गेलेल्या पण अपेक्षित क्षमता प्राप्त न केलेल्यांसाठी निपुण भारत अंतर्गत अभियान सुरू आहे. १०० टक्के शाळा निपुण करण्यासाठी सेसफंड अंतर्गत निधी उपलब्ध करून दिला. शिक्षक व मुख्याध्यापकांचा गौरव करण्याचेही नियोजन आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत वलनी शाळेने जिल्ह्यातून तृतीय क्रमांक पटकावला. पाच व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत यावे, नवोदय प्रवेश परीक्षेत विद्यार्थ्यांची निवड व्हावी, यासाठी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शिका उपलब्ध करून दिल्या. सराव चाचण्यांचेही नियोजन केले.