उद्या चंद्रपुरात जागृती 'मशाल मार्च' प्रथमच एवढ्या.. संघटनां येणार एकत्र !



उद्या चंद्रपुरात जागृती 'मशाल मार्च'
प्रथमच एवढ्या.. संघटना येणार एकत्र!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपुरात जागृती मशाल मंच च्या वतीने दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोजी रात्री नऊ वाजता गांधी चौकातून मशाल मार्च आयोजन केले आहे. या मशाल मार्चमध्ये जवळपास 60 संघटनेचा सर्वपक्षीय सर्वधर्मीय संघटना सहभागी होणार आहेत. या आयोजित मशाल रॅलीत सुधीर मुनगंटीवार, प्रतिभा धानोरकर, विजय वडेट्टीवार, किशोर जोरगेवार, नरेश पुगलीया, सुधाकर अडबाले, तसेच प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, महानगरपालिकेचे आयुक्त हे जनप्रतिनिधी म्हणून विशेष उपस्थिती राहणार आहे.
सध्या देशात होणाऱ्या स्त्री अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. अशा वेळेस तमान स्त्रिवर्गाला आपण सुरक्षित असल्याची भावना जागृत करण्यासाठी, चंद्रपूर सुरक्षित करण्यासाठी, संपूर्ण चंद्रपूरकरांनी एकत्र येऊन आपले चंद्रपूर सुरक्षित करण्याची शपथ या कार्यक्रमात घेण्यात येणार आहे. प्रत्येक संवेदनशील चंद्रपूरकर एकमेकांच्या सोबतीने उभा असेल तर आमच्या महिलांना कोणाचीही भीती वाटणार नाही. हा विश्वास जागृत करण्यासाठी महिलांना वाटणाऱ्या अंधाराची भीती घालविण्यासाठी या मध्यरात्रीचा मार्च चंद्रपुरात जागृत मशाल मंच द्वारे केला जात आहे.
हा मशाल मार्च गांधी चौक येथील गांधीजीच्या पुतळ्याला
माल्यार्पण करून मशाल रॅली रात्री नऊ वाजता गांधी चौक येथून प्रस्थापित करून, स्त्री शक्ती दर्शवणारे सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात येणार आहे. तसेच मान्यवर नेतागन यांचे असते 'मशाल प्रज्वलन'(प्रियांबंल) भारतीय राज्यघटना उद्देशिकेचे वाचन होईल व मशाल रॅलीचे प्रस्थान करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून रॅलीचे प्रस्थान करण्यात येईल. रॅलीचे समापन प्रियदर्शनी चौक येथे समापनापूर्वी 'सुरक्षा शपथ' पूर्ण जनता घेईल. व राष्ट्रगीताने रॅलीचे समापन करण्यात येईल. अशी माहिती आज आयोजित पत्रकार परिषदेतून अश्विनी खोब्रागडे, पारोमिता गोस्वामी , वर्षा जामदार, जयश्री कापसे- गावंडे, तब्बूशम शेख, यांनी दिली. यासोबत इतर महिलांची उपस्थिती होती.