दिनचर्या न्युज :-
वरोरा - माढेळी :--
सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस अभियंता दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. त्यांच्या 163 व्या जयंतीनिमित्त देशभर अभियंता दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी वरोरा तालुक्यातील सर्व अभियंता वर्गांनी अहिल्याबाई होळकर वृद्धाश्रमात एक विशेष कार्यक्रम आयोजित करून सामाजिक बांधिलकी जोपासत मानवी सेवाभावाला प्रोत्साहन दिले आहे.
यावेळी वरोरा तालुक्यातील सर्व शासकीय सेवेत कार्यरत आणि सेवानिवृत्त झालेले अभियंता शासकीय मान्यता प्राप्त कंत्राटदार महाविद्यालयात शिकविणारे प्राध्यापक अभियंता तसेच गणमान्य व्यक्ती एकत्र येऊन सोनुबाई येवले यांच्या अहिल्याबाई होळकर वृद्धाश्रमात सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची 163 वी जयंती साजरी केली यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त अभियंता संतोषराव पिंपळशेंडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून हिरालाल लोया कनिष्ठ महाविद्यालयाचे इलेक्ट्रॉनिक्स विद्याशाखा प्रमुख श्याम भाऊ राजूरकर हे होते या दरम्यान अभियंता अनिल टिपले ,चावडा साहेब, हिरालाल बघेले ,अमित लाहोटी आदींनी भारतरत्न विश्वेश्वरय्या यांच्या जीवन कार्यावर आपल्या मनोगतातून प्रकाश टाकला तसेच यावेळी वृद्धाश्रमातील अपंग दिव्यांग उपेक्षित व वंचित घटकातील महिलांना व पुरुषांना तसेच उपस्थित वर्गाला फळ वाटप व आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दरम्यान वृद्धाश्रमातील मोकळ्या जागेवर फळझाडांचे मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच वृद्धाश्रम संस्थेला अभियंता वर्गाच्या वतीने मदत करण्यात आली सोनुबाई येवले यांनी उपेक्षित वंचित घटकातील वेडसर, गरोदर अपंग दिव्यांग वृद्धांना व महिलांना आपल्या वृद्धाश्रमात ठेवून महान कार्य केलेले आहे त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांचा शाल व श्रीफळ देऊन अभियंता वर्गाकडून सत्कार करण्यात आला यापूर्वी देखील अभियंता दिनानिमित्त अभियंता वर्गाकडून सामाजिक उपक्रम राबवत आनंदवन येथील मूकबधिर विद्यालयाला मदत करण्यात आली होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद राजपूत यांनी तर आभार प्रदर्शन दिलीप ढोक यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय कोहाडे, विनय पिंपळकर, अरुण झाडे, अर्चना पिंपळकर, किशोर डोमकावळे आदींनी परिश्रम घेतले अभियंता दिवस हा केवळ साजरा करण्यापुरता मर्यादित नसून गरजूंना मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे कार्य करण्याचे माध्यम असल्याचे एक प्रभावी साधन आहे अशी प्रतिक्रिया समाजात उमटताना दिसून येत आहे