स्थानिक गुन्हे शाखेची दोन वेगवेगळ्या जुगार अड्ड्यावर कारवाई



स्थानिक गुन्हे शाखेची दोन वेगवेगळ्या जुगार अड्ड्यावर कारवाई

पो. स्टे. चंद्रपूर शहर हद्दीत सुरु असलेल्या 52 पत्याच्या जुगारावर LCB, चंद्रपूरची कारवाई

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
दि. ,01/09/2024 रोजी पो. स्टे. चंद्रपूर शहर हद्दीतील विठ्ठल मंदिर वॉर्डांत सुरु असलेल्या जुगार अड्डयावर LCB पथकाने धाड टाकून मोक्क्यावर 52 तासपत्ये जुगाराचे साहित्य अं. किं. 100/- व 17,700/- रु. रोख रक्कम,असा एकूण 17800/- रू. चा मुद्देमाल व आरोपी नामे वसंत महादेव येलमुले वय ,63, अरुण पंजाबराव घुमडे वय 68 वर्षे , विश्वास रामचंद्र पडगिलवार वय 55 ,प्रशांत श्रावण गाडगीलवार वय 46 वर्ष , राहुल बाळकृष्ण अंबिरवार वय 41 वर्ष, गिरीश केशव खडसे वय 26 वर्ष , कुणाल यशवंत ग गरगेलवार वय 36 , आकाश राजे चौधरी वय 28 वर्ष , सुभाष जगदीश जोशी वय 46 सर्व रहा. विठ्ठल मंदिर वाड चंद्रपूर यांना ताब्यात घेऊन
पोस्टे चंद्रपूर शहर येथे अपराध क्रमांक /24 कलम 4,5 म.जू.का अन्वे गुन्हा नोंद करून सदर जप्त मुद्देमाल व ताब्यातील नऊही आरोपीतांना पुढील कारवाई करिता पो. स्टे. चंद्रपूर शहर यांच्या ताब्यात देण्यात आले....
कार्यवाही पथक :- पो.उप.नि विनोद भुरले, पो.हवा रजनीकांत पुट्टवार, किशोर वैरागडे, सतीश अवतरे, ना.पो.अ संतोष येलपुलवार , पो अ नितीन रायपुरे , गोपाल आतकुलवार सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर

लालपेठ जंगल परिसरात जुगार अड्ड्यावर एलसीबीची धाड

आज दिनांक 04/09/2024 रोजी रात्रीदरम्यान लालपेठ जंगल परिसर, पोस्टे चंद्रपूर शहर येथे छापा टाकून जुगार कारवाई केली. सदर गुन्ह्यात एकूण 08 आरोपींना ताब्यात घेतले असून आरोपी फरार आहेत. सदर जुगाअड्ड्यावर आरोपीकडून जुगाराचे 1,65,900/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपीमध्ये माधव उर्फ मुन्ना रामप्रसाद मिश्रा रा. बाबपेठ वार्ड चंद्रपूर,. देवेंद्र सिंग अवतरसिंग गील रा. अष्टभुजा वार्ड चंद्रपूर,, नसिमदिन वाशिर्दीन शेख रा. बिंबा. गेट चंद्रपूर, ,.अश्फाक मुस्ताक शेख रा. कृष्णानगर चंद्रपूर, विपुल संभाजी अत्राम रा. बाबुपेठ चंद्रपूर, ,श्रीनिवास चंद्रय्या उसुमा रा. लालपेठ चंद्रपूर,
.फिरोजखान अनिसखान पठाण रा. अंचलेश्वर वार्ड, चंद्रपूर
,आवेश सुरेश इंचलवार रा. लालपेठ, चंद्रपूर
पाहिजे आरोपी :- धनराज सावरकर, रा. अंचलेश्वर वार्ड, चंद्रपूर
कारवाई पथक:-पोउपनी. विनोद भूरले, पोहवा. रजनीकांत पुठ्ठावार, सतीश अवतरे, किशोर वैरागडे, पोशी.गोपाल आतकुलवार, नितीन रायपुरे, गोपीनाथ नरोटे.