50 लाखाची खंडणी, गुन्हा दाखल विनोद खोब्रागडे फरार craim chandrapur



50 लाखाची खंडणी, गुन्हा दाखल विनोद खोब्रागडे फरार
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्हा सत्र न्यायालयात वकिलाला 50 लाख रुपये खंडणी मागणे, जीवे मारण्याची धमकी देणे चंद्रपुरातील वकिलांनी एकत्र येऊन विनोद कवडूजी खोब्रागडे यांच्या विरुद्ध रामनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा सत्र न्यायालयात वकिलांना तुम्हाला खोट्या केस मध्ये अडकविणार, काळे कोट वाले काही करत नाहीत. मि आतापर्यंत मोठ्या मोठ्या राजकीय सह अधिकाऱ्यांना न्यायालयाची हवा दाखवली आहे. त्यांच्यावर केसेस केले आहेत. आरोप मागे घेण्यासाठी वकिलांकडून 50 लाख रुपये खंडणी मागणे न जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार चंद्रपूरचे एडवोकेट अलनवाज रऊप शेख यांनी रामनगर पोलीस स्टेशन येथे दिनांक 23 जून रोजी दाखल केली. त्या तक्रारीच्या आधारे रामनगर पोलिसांनी विनोद खोब्रागडे यांच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 308(5) अन्वे ए पी आर एफ आर आर क्रमांक 490, 2025 अन्वे दखलपात्र गुन्हा नोंद केला आहे. सध्या आरोपी फरार असून लवकरात लवकर त्यांना अटक करावी
या संदर्भात वकील असोसिएशनतर्फे माननीय जिल्हाधिकारी साहेब तथा जिल्हा पोलीस अधीक्षक यांना लवकरात लवकर आरोपीला अटक करावे या संदर्भात निवेदन दिले आहे.
 वकील म्हणाले आमच्या व्यवसाय व स्वातंत्र्यावर गदा आणणारे  कृत्य असून अशा विकृत बुद्धी असणाऱ्याला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी केली आहे.