शुक्रवारपासून ङ्रॅगन पॅलेसचा वर्धापन दिन

नागपूर/ प्रतिनिधी
ओगावा सोसायटीच्या वतीने कार्तीक पौणिमेेेेनिमित्त विश्वविख्यात ङ्रगन पॅलेस टेम्पल च्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार दि. 23 नोव्हेंबर  रोजी दादासाहेब कुंभारे परीसर , कामठी येथे करण्यात आलेले आहे. सकाळी १०.३० वाजता जपान येथिल प्रमुख विविध बुध्द विहारातील वंदनिय प्रमुख भदंत व भिख्यूसंघाच्या उपस्थितीत विशेष बुध्द वंदनाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी विशेष बुद्धवंदना व धम्मदेशना जपान येथिल प्रसिध्द असलेले आंतरराष्ट्रीय निचिरेन - शु फेलोशिप असोसिएशनचे अध्यक्ष भदंत कानसेन मोचिदा यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून, जपान येथिल प्रमुख  भदंत व उपस्थिती राहणार आहेत ज्यामध्ये प्रामुख्याने जपानचे पूज्य जिट मत्समोटो , हिडेअकी मरू , पूज्य गिक्यो वातनाबे, हिसाना ओशीमा, क्यारोई कोमानाओ, शिनग्यो ईमाई ,  केई - यो इनोऊ , क्योयो फुजी, कांग्यो नोडा, तैगा इचिकावा , युताई ताजावा ,  होन मसुडा,  भोडा टकाकी, गेेंकी इनामी, असाको गुरू, इकुयो कातो, योको होसोनी, क्योको आवाकु, वातारू इन्डो आदिंती विशेष उपस्थिती राहणार आहे.


ड्रगन पॅलेस टेम्पलच्या वर्धापन दिनानिमीत्य महाराष्ट्र राज्याचे मा . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , केंद्रिय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान , महाराष्ट्र राज्याचे उर्जा व उत्पादन शुल्क तथा नागपूर जिल्हयाचे पालकमंत्री  चंद्रशेखर बावणकुळे , सामाजिक न्याय व विषेश सहाय मंत्री राजकुमार बडोले यांची उपस्थिती राहणार आहे.


 डॅगन पॅलेस टेम्पलत्या वर्धापन दिनानिमीत्य विविध सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . यामध्ये प्रामुख्याने मुंबई व नागपूर येथिल कलाकार बुध्द - भिम् गितचे सादरीकरण करतील


 वर्धापन दिनानिमीत्य पॅलेस टेम्पलला भेट देणा-या सर्व उपासक - उपासीका यांना दादासाहेब कुंभारे बहुउद्देशिय प्रशिक्षण संस्था , कामठीच्या वतीने भोजनदान व खिर वाटप करण्यात येईल. डॅगन पॅलस टेम्पलव्या वर्धापन दिनानिमीत्य कार्यक्रमाला उपस्थित राहणा-या जपान येथिल भिक्षू संघाचे आगमन नागपूर येथिल डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळवर गुरूवार दि . २२ नोव्हेंबर २०१८ रोजी होणार आहे. याप्रसंगी ओगावा सोसायटीच्या वतीने अॅड . सुलेखाताई कुंभारे यांच्या वतीने स्वागत करण्यात येईल.