इंडियन रोड काँग्रेसचे अधिवेशन आजपासून नागपुरात
- विभागीय क्रीडा संकुल स्वागतासाठी सज्ज -
- देशभरातून येणार ३ हजार तज्ज्ञ

नागपूर/ २१ नोव्हेंबर
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यजमानपदाखाली मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल येथे होणा - या इंडियन रोङ काँग्रेसच्या ७९ व्या अधिवेशनाची तयारी पूर्ण झाली असून गुरुवार , २२ नोव्हेंबरपासून अधिवेशनाला सुरुवात होत आहे. हे अधिवेशन नागपुरात चौथ्यांदा असून, देश - विदेशातून ३ हजार तज्ज्ञ हजेरी लावणार आहेत. गुरुवार, २२ नोव्हेंबरला सकाळी १०.०० वाजता अधिवेशनाच्या तांत्रिक प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

पहिल्या दिवशी सकाळी ११ ते सायंकाळी ६ .00 दरम्यान एकूण चार तांत्रिक सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. या सत्रामध्ये विद्यार्थी , वैज्ञानिक बांधकाम व्यवसायिक आपले तांत्रिक शोधपत्र ( टेक्निकल पेपर ) सादर करतील . सायंकाळी ८ . 00 वाजता अधिवेशनातील उपस्थितांसाठी प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अशोक हांडे व चमूचा गीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
शुक्रवार, २३ नोव्हेंबरला ७९ व्या इंडियन रोड काँग्रेसच्या अधिवेशनाचे औपचारिक उद्घाटन सकाळी १०.३० वाजता केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, ग्रामीण विकास - महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुडे, उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री ( एमएसआरडीसी ) एकनाथराव शिंदे , राज्यमंत्री प्रवीण पोटे, उर्जा राज्यमंत्री मदन येरावार, गृहराज्यमंत्री रणजीत पाटील विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. या प्रसंगी मुख्य अतिथीच्य हस्ते स्मरणिका आणि आयआरसीच्या विविध जर्नल्स व कोड सलंबितत पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येणार आहे. १२.00 वाजता विविध राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्र्यांसमोर केद्रीय मंत्री नितीन गडकरी मार्गदर्शन करतील. त्यानंतर नितीन गडकरी विदेशी शिष्टमंडळाशी संवाद साधतील. या प्रसंगी रस्ते आणि पूलांच्या निर्मिती संदर्भात चर्चासत्र दुपारी ३.३० वाजता आयोजित करण्यात आले आहे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानंतर सायंकाळी ७ नंतर प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल यांच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
शनिवार, २४ नोव्हेंबरला आयआरसी जर्नल्समध्ये प्रकाशित झालेल्या विविध शोधपत्रांचे सादरीकरण अधिवेशनात सहभागी झालेले तज्ज्ञ करतील.
११ .०० ते ६.00 दरम्यान एकूण सात तांत्रिक सत्रे या दिवशी आयोजित करण्यात आली आहेत. या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर आणि साधना सरगम यांचेसह प्रसिद्ध विनोदी अभिनेते राजू श्रीवास्तव मनोरंजित करणार आहेत .

२७ नोव्हेंबरला ९७ वी कौन्सिल बैठक आयोजित करण्यात आली असून, त्यानंतर अधिवेशनाचा औपचारिक समारोप करण्यात येईल. एकूण २२ ते २६ नोव्हेंबर दरम्यान चालणा-या इंडियन रोड काँग्रेसच्या अधिवेशनात एकूण ११ तांत्रिक सत्रे आयोजित करण्यात आली असून, यातून मिळणाच्या ज्ञानातून रस्त्याच्या संदर्भातील नियम म्हणजे कोड तयार करण्यात येतील. शिवाय राष्ट्राच्या रस्ते आणि पूलांच्या विकासांमध्ये रचनात्मक भर घालतील. यावेळी अधिवेशनात लोकसहभागाला विशेष महत्त्व देण्यात आले असून, त्या अनुषंगाने रस्ते सुरक्षा जागृती क्षेत्रात कार्यरत संस्थाना केवळ माफक शुल्कासह स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले आहेत . महिनाभर विविध उपक्रमही सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे घेण्यात आले होते. याशिवाय सर्वसामान्य जनतेला तांत्रिक प्रदर्शनी बघण्यासाठी खुली असणार आहे. अधिवेशनाच्या आयोजनासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वात प्रधान सचिव मनोज सौनिक याच्या दिशानिर्देशानुसार सार्वजनिक बांधक विभागाचे सचिव ( रस्ते ) सी. पी. जोशी आणि सचिव ( बांधकाम ) अजीत सगने यांच्या मार्गदर्शनात आयोजन समितीचे अध्यक्ष सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार आणि स्थानिक आयोजन समितीचे सचिव व प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे अधिक्षक अभियंता रमेश होतवानी यांचे व्यवस्थेवर विशेषत्वाने लक्ष आहे.