चंद्रपुरात १७ व १८ जानेवारीला भव्य रोगनिदान उपचार व आरोग्य प्रदर्शनी महामेळावा

चंद्रपूर/प्रतिनिधी:

चंद्रपूर लोकसभा मतदार क्षेत्रात स्वास्थ व परिवार कल्याण मंत्रालय,भारत सरकार,नवी दिल्ली व सार्वजनिक आरोग्य विभाग,महाराष्ट्र शासन आयोजित,राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भव्य रोगनिदान ,उपचार व आरोग्य प्रदर्शनी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.हा महामेळावा दि.१७ व १८ जानेवारी २०१९ ला चंद्रपूर शहरातील चांदा क्लब ग्राउंड येथे वेळ स.१०.०० ते सायंकाळी 08.00 या कालावधीत आयोजित करण्यात आले असल्याची माहिती मंगळवारी शासकीय विश्रामगृह येथे आरोग्य विभागाकडून आयोजित पत्रपरिषदेत देण्यात आली.

या महामेळाव्याचे उद्घाटन केंद्रीय गृहराज्यमंत्री  हंसराज अहीर,यांचे हस्ते होणार असून सदर कार्यक्रमात चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे अध्यक्षतेखाली होणार असून सदर कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल,जिल्हापरिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे,महापौर अंजली घोटेकर,उपमहापौर अनिल फलझेले,विधान परिषद सदस्य नागो गाणार,विधान परिषद
सदस्य अनिल सोले,विधान परिषद सदस्य रामदास आंबटकर,चंद्रपूर विधानसभा क्षेत्र नानाजी शामकुळे,राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार अँड. सजंय धोटे,वरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुरेश उर्फ बाळुभाऊ धानोरकर,आर्णि विधानसभा क्षेत्राचे राजु तोडसाम,वणी विघानसभा क्षेत्राचे आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार ईत्यादीच्या उपस्थितीत होणार असून विशेषतज्ञ डॉक्टरांचे सहकार्याने महामेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर दोन दिवसीय महामेळाव्याकरीता किमान १० ले १२ हजार रूग्णांना सेवा देण्यात येणार असल्याचे आयोजित पत्रपरिषदेत देण्यात आली आहे.


या महामेळाव्याच्या पहिल्याच दिवशी दि. १७ जानेवारी २०१९ ला हृदयरोग,मधुमेह,मुत्रपिंडाचे आजार,अस्थिरोग,मानसिक आजार,मिरगी(फिट),चर्मरोग,गुप्तरोग,एचआयव्ही / एड्स ,कान,नाक,घसा , नेत्र,गर्भाशयाचे आजार ई .सर्व प्रकारच्या आजारांची तज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी व औषधोपचार तसेच संपूर्ण आयुष चिकीत्सा (आयुर्वेद,होमीओपॅथी,युनानी ई.) ,दंत तपासणी,मौखिक आरोग्य तपासणी व उपचार,रक्त,सिकलसेल/बॅलेसेमिया,शुगर,इ.सी.जी,गंभीर आजारासाठी संदर्भ सेवा व  शत्रक्रियेसाठी    सुविधा,आरोग्य विषयक समस्येचे/शंकेचे सल्लामसलत व मार्गदर्शन तसेच चर्चासत्राचे विशेष आयोजन, विविध आरोग्य विषयक प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. तर दुसऱ्या दिवशी दि.१८ जानेवारी २०१९ ला लहान मुलांची संपूर्ण आरोग्य तपासणी व उपचार,लहान मुलांमधील मधुमेह तपासणी (Juvenile Diabetes)व उपचार,मधुमेहग्रस्त मुलांच्या पालकांसाठी तज्ञांमार्फत मार्गदर्शन, तसेच रक्त,सिकलसेल/थॅलेसिमिया,शुगर,ईसीजी इत्यादींची तपासणी करण्यात येणार आहे. 

प्रवीण दोन दिवस महामेळाव्यात करिता   तज्ञ डॉक्टरांची सेवा रुग्णांना देण्यासाठी 25  स्टॉल, आरोग्य प्रदर्शनी करता 25  स्टॉल,औषध वितरण व कक्षाकरिता ६ स्टॉल व चौकशी व नोंदणी कक्षाकरिता २ स्टॉल  असे एकूण ६४ स्टॉल तयार करण्यात येणार आहे.  या व्यतिरिक्त भोजन कक्ष स्वयंपाकगृह तसेच इतर आवश्यकता वेगवेगळे कक्ष तयार करण्यात येणार आहेत.
सदर दोन दिवशीय महामेळाव्याकरीता तज्ञ डॉक्टरांची  चमु त्यामध्ये १ सुपरस्पेशालीस्ट १ वैद्यकिय अधिकारी, १ अधिपरिचारीका,१ वैद्यकीय अधिकारी, अधिसेविका बव एक परिचर अधिपरिचारिका, अधिसेविका, १ परिचर 
असे एकुण २५ पथके राहतील. याव्यतीरिक्‍त आरोग्य पर्यवेक्षक, कार्यकम समन्वयक, आशा गट प्रवर्तक, आशा स्वयंसेविका, सफाईगार, सुरक्षागाई इत्यादी असे एकुण किमान १५० ते २०० अधिकारी/कर्मचारी यांची व्यवस्था महामेळाव्याकरीता करण्यात आलेली आहे. सदर महामेळाव्याकरीता तज्ञ डॉक्टर हे वर्धा येश्रील आचार्य विनोबा भावे, रुग्णालय सावंगी मेघे शासकिय वैद्यकिय महाविद्यालय चंद्रपर व नागपूर ग्रेथून उपलब्ध होणार आहेत.
याव्यतीरिक्‍त उर्वरित वैद्यकिय व इतर जावष्यक मनुष्यवळ राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय व जिल्हा भारोग्य अधिकारी कार्यालय यांचे अधिनस्त असणारा प्रशिक्षीत वग घेण्यात येणार आहे. 

सदर दोन दिवसीय भव्य रोगनिदान, उपचार व आरोग्य प्रदर्शनी महामेळावा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार चेमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर जितेंद्र पापळकर,पोलीस अधिक्षक  डॉ. महेण्वर रेड्डी, चंद्रपूर महानगर पालिकेचे आयुक्‍त संजय काकडे  यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे.या कार्यक्रमाकरीता डाँ. संजय जयस्वाल उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर, मंडळ नागपूर, डॉ. एस.एस. मोरे अधिष्ठाता, शासकिय वैद्यकिय महाविद्यालय चंद्रपूर, डॉ. अभ्युध्द मोघे, विशेष कार्यकारी अधिकारी, सावंगी मेघे रुग्णालय वर्धा, डॉ.प्रमोद राऊत अध्यक्ष आयएमए संघटना चंद्रपूर, डॉ. एम.जे. खान अध्यक्ष आयएपी संघटना चंद्रपूर,डॉ. लक्ष्मीनारायण सरवेरे अध्यक्ष निमा संघटना चंद्रपूर,डॉ.राजीव धानोरकर अध्यक्ष आयुर्वेदिक व्यासपीठ चंद्रपूर, डॉ. प्रमोद कोयाडवार अध्यक्ष होमीओपॅथी संघटना चंद्रपूर यांचे उपस्थितीअसणार आहे. 

विशेष म्हणजे या महामेळाव्यासाठी महामेळावा स्थळी जिल्हाभरातून येणाऱ्या नागरिकांसाठी बंगाली कॅम्प,बस स्टॉप,गांधीचौक व बाबुपेठ येथून मोफत बस सेवा उपलब्ध करण्यात आली आहे .या आरोग्य शिबिराचा जिल्हाभरातील सर्व जनतेनी अवश्य लाभ घ्यावा अशी विनंती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राठोड व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रकाश साठे यांनी केली आहे.