अकोले तालुक्यात दुष्काळ जाहीर करा:आदिवासी बांधवांची मागणी

विष्णू तळपाडे/अकोले(अहमदनगर):
दुष्काळ साठी इमेज परिणाम
राज्यातील पाणी टंचाई लक्षात घेऊन शेकडो गावांमध्ये दुष्काळ जाहिर करण्यात आला.मंत्री मंडळाच्या दुष्काळ निवारण समिती च्या बैठकीत याविषयी निर्णय घेण्यात आला.मात्र वर्षानुवर्षे दुष्काळी असलेल्या आदिवासी तालुक्यांविषयी कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही .याबाबत मुख्यमंत्री यांनी तात्काळ आदेश देऊनही आदिवासी भागात अद्याप कोणत्याही प्रकारची कार्येवाही झालेली दिसत नाही .तेव्हा आदिवासी भागात तत्काळ दुष्काळ जाहिर करावा,आशा प्रकार ची मागणी आज अकोले तालुक्यातील आदिवासी बांधव करताना दिसतात .

आदिवासी भागात पाऊस सर्वाधिक असतो.बहुतेक धरणे ही आदिवासी भागात येतात .धरणांनसाठी आदिवासींच्या जमिनी गेल्या मात्र पाणी धोरणात धरणांमधुन पाणी उचलण्याचा अधिकार आदिवासींना नाही,त्यामुळेच त्यांना पाणी घेता येत नाही .आदिवासी भागात पावसाळ्यानंतर पुढचे आठ महिने नेहमीच पाण्याची समस्या असते .

हि वस्तुस्थिती लक्ष्यात न घेता नेहमीच आदिवासी भागावर अन्याय होत असल्याची जनतेची भावना आहे.राज्यात इतर ठिकाणी दुष्काळ घोषित करते;परंतु आदिवासी भागात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.रोजगाराचा प्रश्न ही निर्माण झाला आहे .

राज्यकर्तेच्या उदासीन धोरणामुळे आदिवासींना दरवर्षी रोजगारासाठी स्थलांतर करावे लागते.तरी आदिवासी भागातील या समस्या लक्षात घेऊन तात्काळ दुष्काळ जाहीर करण्यात यावा आणि सर्व दुष्काळी सवलती लागु कराव्यात.दरम्यान आदिवासी भागात दुष्काळ जाहिर करण्याबाबत राज्य शासन लवकरच निर्णय घेईल,आशी अपेक्षा आदिवासी बांधवाच्या मनात आहे.