महावितरणच्या ग्राम विदुयत व्यवस्थपकांना ऊर्जामंत्री देणार प्रमाणपत्र

चंद्रपूर/प्रतिनिधी:

महावितरण कंपनी आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर जिल्ह्यासाठी प्रशिक्षण देण्यात  आलेल्या ग्राम  विदुयत व्यवस्थपकांना उद्या दिनांक   दिनांक १९ जानेवारी रोजी प्रमाणपत्र वितरीत करण्यात येणार आहे. 
राज्याचे ऊर्जा मंत्री आणि पालकमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ग्राम विदुयत व्यवस्थपकाना प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम दुपारी २ वाजता धरमपेठ येथील वनामती सभागृहात होणार आहे. खा. कृपाल तुमाने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर विशेष पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील. कार्यक्रमास प्रमुख उपस्थितांमध्ये आमदार सुनील केदार,सुधीर पारवे, समीर मेघे, डी.मल्लिकार्जुन रेड्डी, नागपूर जिल्हा विदुयत सनियंत्रण समितीचे अध्यक्ष गिरीश देशमुख यांचा समावेश आहे. 
महावितरणकडून ग्राम पंचायतीच्या हद्दीत विदुयत देखभाल आणि दुरुस्तीसाठी आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांची निवड करून त्यांना महावितरणच्या नागपूर येथील  प्रशिक्षण केंद्रात ४ आठवड्यांचे प्रशिक्षण देण्यात आले . सप्टेंबर-२०१८ पासून आतापर्यन्त  ६ तुकड्यांमध्ये  १५३ उमेदवारांना प्रशिक्षित करण्यात आले आहे.  सध्या ७ व्या तुकडीचे प्रशिक्षण सुरु असल्याची  माहिती नागपूर परिक्षेत्राचे  प्रभारी  संचालक दिलीप घुगल यांनी दिली.