स्त्यावरील खड्डे तातडीने बुजवा

महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उपमुख्यधिकाऱ्यांना निवेदन 
वाडी(नागपूर)/अरूण कराळे:
\
दत्तवाडी ,काटोल बायपास मार्ग , राष्ट्रीय महामार्गावरील कैलाश पेट्रोल पंप ते एमआयडीसी टी पॉइंट पर्यत कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्त्यांची चाळण झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहे त्यामुळे रस्त्यावरून प्रवास करताना कसरत करावी लागत असल्याने नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया आहेत. चुकीच्या पध्दतीने काम करणार्‍या अशा कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करुन रस्ते दुरुस्तीची मागणी केली आहे . या खड्डयामुळे दुचाकी वाहन चालकांचे अपघात सुध्दा झाले आहे .वाडी नगर परिषदमधील संबंधित विभागांनी या कडे लक्ष देऊन खड्डयाचा निपटारा करावा अन्यथा महाराष्ट्र वाहतूक सेना द्वारा आंदोलन करण्याचा इशारा वाडी नगर परिषदचे उपमुख्याधिकारी आकाश सहारे यांना निवेदनातुन दिला आहे . यावेळी महाराष्ट्र वाहतूक सेनाचे राज्यचिटणीस किताबसिंह चौधरी, कार्यकारी अध्यक्ष भाऊराव रेवतकर,सचिव अखिलेश सिंह,उपाध्यक्ष राकेश अग्रवाल,तालुका प्रमुख राम सिंह,वाडी शहर प्रमुख अभय वर्मा,लाव्हा शहरप्रमुख संतोष शेंडे,जितेंद्र श्रीवास्तव आदी उपस्थित होते .