तापमान खाली घसरले

हवामान विभागाच्या अंदाजानुसार उत्तरेकडून येणाऱ्या थंड वा-यांमुळे थंडी वाढली आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमधील दिवस-रात्रीचे तापमान सामान्यपेक्षा ५ ते ८ डिग्रीपर्यंत खाली घसरले आहे. नागपुरात मागील २४ तासात किमान तापमान ३.४ डिग्रीने खाली घसरले असून, १०.८ डिग्री सेल्सिअसपर्यंत आले आहे. नागपुरात दिवसभर कडक ऊन असूनही कडाक्याची थंडी कायम होती.
विदर्भात बुलडाणा येथील किमान तापमान ८.६ डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आले. सोमवारी बुलडाणा विदर्भात सर्वाधिक थंड राहिले. हवामान विभागानुसार वाशीम ९.४, ब्रह्मपुरी १०.३, अमरावती, यवतमाळ १०.४, गोंदिया १०.८, चंद्रपूर १२ आणि गडचिरोली येथे १३.२ डिग्री सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले.