धक्कादायक:शेंगदाणा पापडीत आढळल्या अळ्या

नागपूर/खबरबात:

शेंगदाणा पापडी सर्वांनाच आवडते,तुम्ही जर शेंगदाणा पापडीचे म्हणजेच चिक्कीचे फॅन असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे, शरीरातील शुगर,हिमोगलोबिन लेवल शरीरात कायम ठेवण्यासाठी शेंगदाणा पापडीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो.तसेच गोड खाणार्‍यांसाठी देखील शेंगदाणा पापडीची मोठी मागणी असते. मात्र हीच शेंगदाणा पापडी तुमच्या जीवावर देखील उठू शकते. 

असाच एक आरोग्यासोबतचा धक्कादायक प्रकार देशाच्या सुरक्षेसाठी असलेल्या जम्मू काश्मीर येथील सैनिकासोबत घडला आहे.हा सैनिक चंद्रपूर येथील रहिवासी असून तो जम्मू काश्मीर येथे देशाच्या रक्षणासाठी तैनात आहेत, त्यांच्या घरच्या लोकांनी त्यांना घरून लाडू,चिवडा, व गोड धोड व वेगड काही तरी म्हणून नागपूर येथून तयार होणाऱ्या श्री जी चिक्की स्नाक्स कंपनीच्या शेंगदाणा आणि राजगिऱ्याची पापडीचे पाकिटे खरेदी केले, व हे पाकिटे जम्मू येथील सैनिकात असलेल्या मुलाला पाठविले, मात्र हे पाकीट सैनिकाने फोडले व तीतीक्यात त्या पाकिटातून अळ्या व सोंडे पडले संपूर्ण पापडी बघितल्या नंतर त्यात बुरशी देखील लागली असल्याचे समोर आले. या पाकिटावर १ नोव्हेंबर २०१८ अशी पापडीला पॅकिंग झाली असल्याचे नमूद आहे. त्यामुळे आता श्री जीची पापडी खातांना जरा विचार करूनच खाव लागणार आहे. 

शरीरात आयरन, प्रोटीन, कैल्शियम, कॉपर, सेलेनियम, जिंक, फोट, नियासिन, कार्बोहाइड्रेट, विटामिन ई, विटामिन बी6, इत्यादीचे प्रमाण शेंगदाणा पापडी शरीरात मेंटेन करते,त्यामुळे या पापडीला बाजारात चांगलीच मागणी असते,.चिक्कीमध्ये निघालेल्या अळ्यांमुळे ग्राहकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधितांनी केवळ जबाबदारी झटकण्याचेच काम केले आहे.मात्र नागपूर व चंद्रपूर येथील अन्न व औषध प्रशासन मात्र कुंभकरिणी झोपेत असल्याचे दिसून येत आहे.

नुकतेच अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने प्राप्त माहितीच्या आधारे २ जानेवारीला पाचपावली, रेल्वे गेट क्र. १ येथील गंगा स्वीट या बनावट पिस्त्याचा वापर करून सोनपापडी तयार करणाऱ्या कारखान्यावर कारवाई करून ३ लाख १६ हजार ७४५ रुपये किमतीची ४८७३ किलो सोनपापडी जप्त केली.त्यात कंपनीच्या खाद्याचा दर्जा व बनवटी साहित्य जप्त केले होते. 

त्यामुळे आता अश्या कंपन्यांवर अन्न व औषध प्रशासन काय कारवाई करते हेच बघणे महत्वाचे ठरणार आहे.