भानेगावात अवैध दारू विक्रेत्यावर गुन्हा दाखल


सावनेर/खापरखेडा प्रतिनिधी: 

भानेगाव परिसरात वार्ड क्र.१ येथे मुलींची छेडछाड व अवैध दारू विक्री प्रकरणाची भानेगाव येथील महिलांनी तक्रार खापरखेडा पोलिस स्टेशन येथे केली ग्रामपंचायत सदस्य कुंदाताई धनवटे यांच्या उपस्थिती भानेगाव येथील महिलांनी भानेगाव ग्रामपंचायत येथील वार्ड क्र. १ येथे आरोपी मनोज उर्फ लखन जागेश्वर वानखेडे हा मागील वर्षापासून अवैध प्रकारे दारूविक्रीचा व्यवसाय वाढवुन भानेगाव येथील वार्ड क्र.१ परिसरात दारू विक्री व्यवसाया मुळे परिसरात दहशत निर्माण केली आहे व परिसरातील मुली सोबत छेडखाणी आरोपी मनोज उर्फ लखन जागेश्वर वानखेडे करीत असल्याचा आरोप भानेगाव येथील महिलांनी केला येथे राहणाऱ्या ग्रामस्थांना या विक्रीचा त्रास होत असल्याने येथील महिलांनी खापरखेडा पोलिस स्टेशन गाठले व येथील पोलिस निरीक्षक अरुण त्रिपाठी त्रिपाठी त्रिपाठी निरीक्षक अरुण त्रिपाठी यांना रितसर तक्रार दिली व अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई करण्याची मागणी केली यावेळी तपास चक्रे फिरवीत खापरखेडा पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांनी आरोपी मनोज उर्फ लखन जागेश्वर लखन जागेश्वर वानखेडे याला ताब्यात घेतले आरोपीवर अवैध दारू विक्री करीत असल्यामुळे गुन्हा दाखल केला.