चंद्रपूर पंचायत समितीतील सर्व ग्रामपंचायत ग्रामसेवकांनी गट विकास अधिकारी याकडे सोपवल्या चाब्या !
चंद्रपूर - महाराष्ट्र शासनाच्या तुगडीक धोरणाच्या विरोधात राज्यातील 22000 ग्रामसेवकाच्या प्रलंबित विधी व न्याय मागण्याची पुर्तता करण्यासाठी ग्रामसेवक संघटना 22 आगस्ट पासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले असून आज सर्व ग्रामसेवकांनी आपापल्या ग्रामपंचायतील शिक्के व चाब्या गटविकास अधिकारी पंचायत समिती यांच्या सुपूर्द केल्या याअगोदर नऊ ऑगस्ट पासून हे आंदोलनाचे स्वरूप वाढत गेले. याअगोदर कार्यालयासमोर एक दिवस धरणा 13 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन 16 ऑगस्टला पालकमंत्री यांच्या घरासमोर धरणे आंदोलन 20 ऑगस्ट रोजी मंत्री, राज्यमंत्री., प्रधान सचिव यांच्या शासकीय निवासस्थानी धरणे, 21 ऑगस्ट रोजी जिल्हा अध्यक्ष सरचिटणीस यांचेमार्फत पालकमंत्र्यांना निवेदन बाविस ऑगस्ट पासून अनिश्चित कालीन जिल्हाभर काम बंद आंदोलन. सुरू करण्यात आले आहे. जर शासनाने ग्रामसेवकाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण केल्या नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामसेवक संघटनांनी दिला आहे यावेळी ग्राम विस्तार अधिकारी नगराळे, नागदेवते, ग्रामसेवक चौधरी, ग्रामसेवक केवे, ग्रामसेविका सौ नंदेश्वर मॅडम,सौ बागडे मॅडम, सौ. टापरे मॅडम, सौ. माथनकर, ग्रामसेवक वेस्कडे, ग्रामसेवक विरुटकर, धुर्वे, डवरे, वासाडे, सौ. मानकर, बोरेवार, चांभारे, येवले, निमसरकर, देवगडे, पिदुरकर, यांची उपस्थिती होती. तसेच सरपंच संघटने कडून ही यहा राज्यव्यापी ग्रामसेवक संघटनेच्या बनला पाठिंबा जाहीर केला.