जिल्हा सामान्य रुग्णालयात. 'निष्पाप लोकांचा, जीवघेणा अपघाताचा थरार !

जिल्हा सामान्य रुग्णालयात जीवघेणा अपघाताचा थरार !


 

दोन ठार तर तीन गंभीर जखमी !

चंद्रपूर :-

जिल्हा सामान्य रुग्णालयात पहाटे सूर्य निघायच्या आत झालेल्या जीवघेण्या अपघातात दोघांचा कायमचा सूर्य मावळला तर तिघांची प्रक्रुती चिंताजनक असल्याने त्यांच्या समोर म्रुतुचे सावट गडद झाले आहे. मिळालेल्या माहिती नुसार सकाळी ६ वाजता रुग्णांचे नातेवाईक उठून तोंडात ब्रश टाकून तर कुणी दंत मन्जन नी दात घासत असतांना त्यांच्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या व्हैन धडक दिली, बालाजी वार्ड गोपालपुरी येथील एका महिलेने आत्महत्या केल्यामुळे तिचा म्रुतदेह एका अम्बुलन्स (व्हैन M H -B F 5815)ने जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी आणला होता तो म्रुतदेह शवविच्छेदन ग्रूहात ठेवल्यानंतर नवशिक्या आणि मद्द्य प्राशन केलेल्या ड्रायव्हर युवकाने ती व्हैन कंट्रोल बाहेर गेल्याने झालेल्या धडकेत मुमताज बेगम वय 57 ह्या जागीच ठार झाल्या तर दुसरे सुधीर गरांडे वय 70 वर्ष हे व्यक्ती काही वेळातच दगावले आणि तीन व्यक्ती गंभीर जखमी झाले.त्यात एकाची प्रक्रुती पुन्हा चिंताजनक असून ह्या  अपघाताचा थरार बघणाऱ्यानी ओरड केल्याने तिथे एकच गर्दी झाली.जिल्हा सामान्य रुग्णालयातील बहुदा ही पहिलीच घटना असून त्या ड्रायव्हर युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.