अमरावती येथे महाराष्ट्र नाभिक साहित्य संम्मेलन!
अमरावती येथे महाराष्ट्र नाभिक साहित्य
                          संमेलन!
चंद्रपूर : महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघ,  महाराष्ट्र आयोजित अमरावती येथे महाराष्ट्र नाभिक साहित्य संमेलन दिनांक 9/11 / 2019 ला सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत  राहणार आहे कै.  स्थळ राम नगरकर साहित्यनगरी हॉल टाऊन नेहरू मैदान अमरावती येथे संपन्न होत आहे. यानिमित्ताने समाजामध्ये दडलेली प्रतिभा  सर्वांसमोर आणण्यासाठी एक दिवसीय नाभिक साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या आनंदाच्या क्षणी  आपण या ऐतिहासिक क्षणाचे सर्व  आमंत्रित आहात.  या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय गोपाल कृष्णाची मांडवकर,  ज्येष्ठलेखक, साहित्यिक, तथा ज्येष्ठ उपसंपादक दैनिक लोकमत नागपूर, तसेच स्वागताध्यक्ष माननीय शरदरावजी ढोबळे ज्येष्ठ साहित्यिक यवतमाळ, सहस्वागताध्यक्ष  माननीय प्रकाशजी नागपुरकर ज्येष्ठज्येष्ठ ना.  समाज सुधारक साहित्य अभ्यासक  अमरावती,  प्रमुख अतिथी उत्तम रावजी बिडवे ज्येष्ठ साहित्यिक,  बुलढाणा,  प्रमुख अतिथी व मार्गदर्शक माननीय शिवलिंगजी  काटेकर ज्येष्ठ साहित्यिक व वराडी कवी यांची उपस्थिती राहणार आहे.  तरी सर्व महाराष्ट्रातील नाभिक समाजातील समाज बांधवांनी या साहित्य संमेलनाला उपस्थित राहावे हीच आयोजक महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघ अमरावती परिवार व संपूर्ण सभासद वृंद यांच्याकडून  आव्हान करण्यात येत आहे.