रेती माफीयावर तहसिलदारांनी कसला शिकंजा! कारवाईसाठी पथकाची नेमणुकरेती माफीयावर तहसिलदारांनी कसला शिकंजा!
रेती माफीयावर तहसिलदारांनी कसला शिकंजा!
कारवाईसाठी पथकाची नेमणुक

चंद्रपूर वि.प्र.- 
जिल्हयात अनेक रेती घाटाचे लिलाव न झाल्याने रेतीची आवक घटली. मात्र घाटाचे लिलाव न झालेल्या रेती घाटातुन तसेच छोटया मोठया नद्या नाल्यातून रेतीचे अवैध उत्खनन मोठया प्रमाणात होत आहे. आणि खास करुन नेमका निवडणूकीचा फायदा घेत कामात गुंतलेल्या अधिकारी व कर्मचा-यांच्या असहायत्तेचा फायदा घेत रेती तस्कर मोठया प्रमाणात रांत्रदिवस रेतीचा उपसा करीत असल्याच्या तक्रारी सबंधीत विभागाला आल्या होत्या. परंतू कारवाई होत नव्हती. जिल्हयात होत असलेल्या वाढत्या चोरीचा माप पाहता आणि वाळु माफीयाचे वाढलेले जाळे पाहता त्यामुळे रेती तस्कर गब्बर होवून सर्रास रेतीचे उत्खनन करुन बाजारात बेभाव भवाने रेती विक्री करीत आहेत. यासबंधाच्या तक्रारी नविन तहसिलदार निलेश गौड यांना झाल्या. त्यांनी रुजु होताच २५ दिवसात २२ रेती माफीचावर शिकंजा कसला. त्यात दोन मोठे हायवा, दोन हाफ ट्क आणि १८ ट्क्टर वर कारवाई केली. त्यात दोन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या रेती माफीयावर शिकंजा कसण्यासाठी तहसिलदारांनी तालुक्यात भरारी पथकाची नेमणूक केली आहे. त्यात पथक प्रमुख राजु धांडे, मंडल अधिकारी, सहायक अधिकारी व कर्मचारी प्रकाश सुर्वे, तलाठी पडोली, शैलेश दुव्वावार तलाठी बोर्डा, विलास कुर्रेवार तलाठी पिपरी, रवि तल्हार तलाठी नागाळा, राहुल भोंगळे तलाठी शेणगाव, अन्वर शेख तलाठी मोरवा, प्रविण वरभे तलाठी चांदा रै., दिलीप पिल्लई तलाठी घुग्घुस या पथकांची संपुर्ण तालुक्यात जबाबदारी म्हणून नेमणूक केले आहे.  
चंद्रपूर तालुका घुग्घुस, नकोडा, घोडा घाट, हल्या घाट,  नायगाव घाट, चिरोली घाट, मुंगोली घाट तसेच ईरई नदी पात्रातील रेती घाटातून रेतीचे अवैधरित्या उत्खनन व वाहतूक होत असल्याबाबत तक्रारी प्रसार माध्यमातून व्त्त प्रसिध्दी होत आहे.
चंद्रपूर तालुका घुग्घुस, नकोडा, घोडा घाट, हल्या घाट,  नायगाव घाट, चिरोली घाट, मुंगोली घाट तसेच ईरई नदी पात्रातील रेती घाटातून रेतीचे अवैधरित्या उत्खनन व वाहतूक होत असल्याबाबत तक्रारी प्रसार माध्यमातून व्त्त प्रसिध्दी होत आहे.
 त्या अनुसंघाने रेतीचे अवैध वाहतूक, उत्खनन यावर आळा घालण्याकरीता तसेच नियमाणूसार दंडात्मक कारवाई करण्याकरीता या भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.  


 यापुढे महसुल प्रशासन रेती माफीयावर परिपुर्ण शिकंजा कसल्या जाईल काय? असा प्रश्न मात्र नागरिकात उपस्थित होत असतांना एका सुज्ञ व्यक्तीने म्हटले की, तहसीलदार साहेबांनी पथक नेमले खुप चांगले झाले पण साहेब, या पथकातील अधिकारी व कर्मचारी सुरुवातीपासुनच सबंधित रेती माफीयांशी सबंध असल्यामुळे कारवाई करणार काय? आणि जर '' कुंपणच शेत खात "असेल तर आपण निर्माण केलेल्या पथकाचा उपयोग होईल काय?  या रेती तस्करांवर आतापर्यंत किती कारवाया झाल्या तरी ते राजरोसपणे न थांबता सर्रास रेती उत्खनन करतात. याला आशिर्वाद म्हणायचा का?