सत्ता काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी कडे.भाजपचे पानिपत ?

गडचांदूर नगर परिषदमधे काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सविता टेकाम विजयी,

सत्ता काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी कडे.भाजपचे पानिपत ?

चंद्रपूर :-

गडचांदूर नगरपरिषद निवडणूक ही चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलवीणारी ठरली असून माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि माजी खासदार हंसराज अहिर यांनी घेतलेल्या जाहीर सभा आणि त्यांनी दिलेली आश्वासने याला भीक न घालता गडचांदूरकरानी भाजपला चक्क नाकारले असल्याचे चित्र आहे.यामधे काँग्रेसच्या नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार सविता टेकाम या निवडून आल्या असून पक्षीय बलाबल असे आहे.काँग्रेस-5, राष्ट्रवदी-4.. शिवसेना-5, शेतकरी सं.-1, व भाजपा-2.
या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ज्योती कंठाळें ह्या प्रभाग क्रमांक ७ मधे विजयी झाल्याच्या घोषणा होत्या मात्र फेरमोजणीत त्या हरल्याचे जाहीर करण्यात आले.