ओ.बि.सी. ची स्वातंत्र जात निहाय जनगनना केद्रं सरकारला करावीचं लागेल:- कल्याणराव दळे (ओ.बि.सी. नेते)ओ.बि.सी. ची स्वातंत्र जात निहाय जनगनना केद्रं सरकारला करावीचं लागेल:-
कल्याणराव दळे (ओ.बि.सी. नेते)

ओ.बि.सी.चे नेते, बारा बलुतेदार महासंघाचे बुलंद आवाज, महाराष्ट्र नाभिक महामंडळचा ढाण्या वाघ मा. श्री कल्याणरावजी दळे साहेब
       यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबादमध्ये राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. या मेळाव्यात बोलताना दळे साहेब यांनी ओ.बि.सी. ची स्वातंत्र जातनिहाय जनगनना करण्यात यावी अशी भुमिका घेतली.*
   *नाभिक समाजाचा अनुसुचित जातींमध्ये समावेश करण्यासाठी राज्य सरकार मार्फत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविणे, बारा बलुतेदारांचे आर्थिक विकास महामंडळ स्थापन करुन अगदी मोजक्या कागदपञावर कर्ज उपलब्ध करून देणे, शिवरत्न जिवाजी महाले यांचे राष्ट्रीय👉🏻👉🏻 स्मारक प्रतापगडावर उभे करण्यात येणार, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे पुर्नगठण करण्यात येणार असुन यांत युवकांना संधी उपलब्ध होणार आहे. तसेच महिला आघाडी निर्मीती करुन पुर्ण महाराष्ट्रात महिलांची सक्शम कार्यकारिणी तयार करण्यात येणार, आशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
                 यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या राज्य कार्यकारणीवर कार्यअध्यक्ष पदी आदरणीय दामोदर काका बिडवे यांची निवड करण्यात आली,  राज्य सरचिटणीस पदी आदरणीय पांडुरंग भवर यांची निवड करण्यात आली, महाराष्ट्र नाभिक युवक महामंडळ युवक प्रदेश अध्यक्ष पदी आदरणीय सुरेंद्र भैयाजी कावरे यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल महाराष्ट्रात सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण होऊन संघटने मध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. सदरील निवडीबद्दल मा. आदरणीय कल्याणरावजी दळे साहेब यांचे विषेश आभार व निवड करण्यात आलेल्या सर्व राज्य पदाधीकारी यांना हार्दिक अभिनंदन पुढील भावी कार्यस् शुभेच्छा.