चंद्रपूर तहसील प्रशासनाची वाळु तस्करा सोबत साठगांठ कोट्यावधीची रेती तस्करी ?

 

कोट्यावधीच्या रेती चोरीत तहसीलदार यांचा सहभाग ? नायब तहसीलदार यांनी रेती ट्रँक्टर पकडून सुद्धा सोडले असल्याची चर्चा.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

तालुक्यात सद्ध्या रेती माफियांनी नद्यांच्या रेतीची मोठ्या प्रमाणात तस्करी चालवलेली असून या रेती चोरीमधे तालुक्यातील तहसील प्रशासन सुद्धा गुंतले असल्याने शासनाचा कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडविल्या जात आहे. राष्ट्रीय खनिज संपत्तीचे सरक्षण करण्याचे काम ज्या खनिकर्म विभाग आणि तहसील प्रशासनाकडे आहे त्या विभागाचे अधिकारीच जर खनिज संपत्ती चोरीमधे अडकले असेल तर खनिज संपत्तीची चोरी ही होणारच,
चंद्रपूर तालुक्यातील घुग्घुस नदी घाटातील वाळू चोरी खूप मोट्या प्रमाणात होत असल्याची तक्रार चंद्रपूर तहसीलदार यांना मिळाल्यावर चंद्रपूर तहसीलदार यांची एक टीम गठित करून वाळू तस्करी नंदीच्या काही अंतरावर साठवून ठेवलेली शेकडो ब्रास वाळू जप्त करते व जप्त केलेल्या वाळूची लिलावी प्रक्रिया 12 फरवरी व 13 फरवरी ला करण्याचे परिपत्रक शासनाकडून देण्यात येते, त्यामध्ये 12 फरवरी ला एका वाळू स्टॉक ची निलामी मध्ये महसूल विभागाला जवळ पास 12 लाख रुपये च्या फायदा होणार असतो, परंतु 13 फरवरीलाच होणारा लिलाव वाळू स्टॉकवरून वाळू चोरी केल्या जाते, त्यामध्ये 282 ब्रास वाळू च्या स्टॉक मधून 161 ब्रास वाळू चोरटय़ांनी चोरी केली असते. त्या मध्ये घुग्घुस पोलीस स्टेशनमधे वाळु चोरी गेल्याची तक्रार तहसील विभागाकडून देण्यात येते व 13 फरवरीचा लिलाव पण रद्द करण्यात येतो तर मग 121 ब्रास वाळू नायब तहसीलदार साळवे हे कोणत्या शासनाच्या परिपत्रकाच्या आधारे वाळू तस्करा ला लिलाव न करता फक्त 1 लाख रुपयांत देतात ? हा प्रश्न गंभीर असून या प्रकरणी तहसील प्रशासनाचे रेती तस्करासोबत मधुर सबंध असल्याचे कळते. मागील काही दिवसांपूर्वी नायब तहसीलदार गादेवार यांनी दाताला रोडवरील एक राजकीय रेती तस्कराचे ट्रक्टर पकडले असतांना पैसे घेवून ते ट्रक्टर सोडले असल्याची माहिती असल्याने तहसील प्रशासनाचे रेती माफिया सोबत असलेले साटेलोटे यामुळे सरकारी संपत्तीची कोट्यावधी रुपयाची लूट केल्या जात आहे.  तहसीलदार यांच्या या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करावी अशी मागणी आता होऊ लागली आहे.