भिवापुर वार्ड हनुमान मंदिराजवळ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण भेटल्याने परिसर सील !corona po.

भिवापुर वार्ड हनुमान मंदिराजवळ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण भेटल्याने परिसर सील 

दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर :- राज्यात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता चंद्रपुर शहरात कोरोनाच्या रुग्णही सातत्याने वाढ होत आहे. भिवापुर वार्डात एक ६२ वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह अहवाल दिनांक ५ /६/:२०२० ला आला. भिवापूर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण भेटल्यामुळे वार्डातील परिसर सील करण्यात आलेला आहे. चंद्रपूर शहरात आतापर्यंत कोरोना पॉझिटिवची संख्या २८ झाली आहे. त्यात आतापर्यंत 22 रुग्ण बरे झाले आहे. जिल्हात ६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत वैद्यकीय महाविद्यालय त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रशासन जिल्ह्यात प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना मोठ्या प्रमाणात करित आहे.भिवापूर वॉर्डातील काही भाग सील करण्यात आला आहे. नागरिकांनी आपल्या घरीच राहावे,
कोरोना विषाणुला रोखण्यासाठी वारंवार हात साबणाने धुवावे, तोंडावर मास्‍क बांधने, शोशल डिस्टनचे पालन करणे, प्रशासनाकडून सांगण्यात आलेल्या नियमाचे पालन करावे. आपणच आपली काळजी घ्यावी. तरच आपण कोरोनावर मात करू शकतो.