चंद्रपूरच्या चिमुकल्यांची चिमूरात वाह वाह
दिनचर्या न्युज :- चिमूर
सात फेब्रुवारी 2021 रोजी चिमुर पोलीस उपविभाग तथा रोटरी क्लब चिमुर यांचे संयुक्त विद्यमाने चिमुर येथे भव्य खुली मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातून तसेच जिल्ह्याबाहेरील तरुण-तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाले असता चंद्रपूर च्या दोन चिमुकल्यांनी आपल्या धावण्याच्या प्रदर्शनाने सर्व प्रेक्षकांचे लक्ष वेधून चिमूर करांना मंत्रमुग्ध केले. ते चिमुकले म्हणजे आठ वर्षीय रोशन प्रवीण ठाकरे व नऊ वर्षीय दिव्यांका राजेश दुर्गे हे होय. रोशन याने पुरुष गटातील दहा किमी अंतर अवघ्या 50 मिनिटात व दिव्यांका हिने महिला गटाचे पाच किमी अंतर अवघ्या पंचवीस मिनिटात पूर्ण करुन सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले यावेळी सर्व प्रेक्षकांनी त्यांचे तोंड भरून कौतुक केले. आयोजकांनी त्यांची दखल घेत त्यांना व्यासपीठावर बोलावून गौरविण्यात आले. नितीन बगाटे सहा.पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग चिमुर यांच्या हस्ते चिमुकल्यांचा सत्कार करण्यात आला. हे दोघेही गेल्या वर्षभरापासून मुकेश तेलतुंबडे सर यांच्या मार्गदर्शनात धावण्याचा सराव करीत आहे.
यावेळी शंकपाल सर उपविभागीय अधिकारी,पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे, श्री गबने, श्री बोरकुटे, सर उपस्थित होते. पुरुष गटातील प्रथम द्वितीय व तृतीय पुरस्कार अनुक्रमे लीलाराम बावणे,शादाब पठाण, प्रतीक पंचबुद्धे यांना देण्यात आला तर महिला गटातून प्रथम द्वितीय व तृतीय पुरस्काराचे मानकरी अनुक्रमे श्रेया किरमिरे, तेजस्विनी लांबकाते, आस्था निंबाळकर ह्या ठरल्या. आयोजकांच्या उत्तम नियोजनाने सर्व खेळाडूंचे चेहऱ्यावर समाधान दिसत होते.