चंद्रपूर महानगरपालिका आमसभेत सत्ताधारी व विरोधक यांच्यात हाणामारी!


चंद्रपूर महानगरपालिका आमसभेत सत्ताधारी व विरोधक यांच्यात हाणामारी!


चंद्रपूर :
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर महानगर पालिका आमसभेत जो प्रकार आज घडला तो निंदनीय असून ही
देशातील पहीली घटना असेल की, सत्ताधारी डायसवरून उतरून मारपीठ करण्यासाठी खाली आले. चक्क महापौर यांनी सुद्धा नेमप्लेट झिरकावली. चंद्रपूर महानगरपालिका आमसभेत सत्ताधारी व विरोधक यांच्यात हाणामारी घडली.
सभागृहासाठी अशोभनीय प्रकार घडला गेला.
विरोधी नगरसेवकांचे म्हणणे होते की, आम्हाला बोलायची संधी मिळत नाही. आँनलाईन मिटिंगच्या नावाने कुठल्याही विषयावर चर्चा करण्यात येत नाही. आम्ही सदस्य नाही का, असे म्हणत आमसभेत घुसून बॅनरबाजी करणारे काँग्रेस नगरसेवक आणि सत्ताधारी भाजप नगरसेवक एकमेकांसमोर उभे ठाकले. एवढेच नाही तर स्थायी समिती सभापती रवी आसवानी आणि नंदू नागरकर यांनी एकदुसऱ्यांवर हात उचलण्याचा प्रयत्न केला. या अभूतपूर्व गोंधळामुळे काही मिनिटे सभा तहकूब करण्यात आली. हा प्रकार गुरुवारी चंद्रपूर शहर महानगर पालिकेच्या आमसभेत घडला. कोविडच्या पार्श्वभूमीवर मनपाची आज ऑनलाइन आमसभा आयोजित केली होती. महानगर पालिका चंद्रपूर मध्ये आमसभा सुरू असताना मनसेचे नगरसेवक सचिन भोयर हे शहरात होत असलेल्या पाण्याच्या पाईपलाईन टाकण्यात आले. परंतु तसेच्या तसे खोदून त्यात पावसाळ्यात चिखलातून नागरिकांना गाळणात तुडवत जात आहे.
सभा सुरू झाल्यानंतर काही वेळात मनसेचे नगरसेवक सचिन भोयर अमृतच्या विषयावरून कार्यकर्त्यांसह सभागृहात प्रवेश करून निषेध नोंदवला. त्यानंतर काँग्रेसच्या नगरसेवकांनीही सभागृहात येऊन बॅनरबाजी केली. या प्रकाराला सत्ताधारी नगरसेवकांनी विरोध केला. तेव्हा काँग्रेस आणि सत्ताधारी भाजप नगरसेवक समोरासमोर आले. शाब्दिक बाचाबाची सुरू असतानाच सभापती आसवानी आणि नागरकर यांनी एक दुसऱ्यांवर हात उचलण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने सभागृहात चांगलाच गोंधळ उडाला. त्यानंतर महापौर यांनी काही मिनिटांसाठी सभा तहकूब केली.