शुभम गोविंदवारला मिस्टर अँड मिस इंडिया 2021 चा पुरस्कार सर्वत्र कौतुकाचा वर्षांव!
शुभम गोविंदवारला मिस्टर अँड मिस इंडिया 2021 चा पुरस्कार सर्वत्र कौतुकाचा वर्षांव!

दिनचर्या न्युज
चंद्रपूर :-
पुणे येथील फाईन आर्ट इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट प्रेझेंट मिस्टर अँड मिस इंडिया आयकॉनिक फेस 2021 स्पर्धेचे आयोजन 3 ऑगस्ट ला 14 ते 30 वर्ष वयोगटातील स्पर्धक का करिता केल्या गेले ज्यामध्ये स्पर्धकांना आप आपल्या नावाची नोंदणी करण्याकरिता 11 जुलै ते 25 जुलै ही मुदत देण्यात आली व अंतिम यादी नंतर स्पर्धकांना कोरोनाविषाणू च्या प्रादुर्भावामुळे ऑनलाइन इंस्टाग्राम च्या माध्यमातून वॉक शूट व्हिडिओ आणि दोन फोटो व इंट्रोडक्शन चा व्हिडिओ अपलोड करण्याच्या सूचना दिल्या या स्पर्धेमध्ये भोपाल, लखनऊ, दिल्ली, हरियाणा, चंद्रपूर, झाशी, नागपूर, पुणे, हैदराबाद येथील 26 पुरुष व 29 स्त्रीयांनी सहभाग घेतला होता या सहभागी स्पर्धेत अंतिम फेरीत चंद्रपूरातील सर्वसामान्य कुटुंबातील श्रीकांत गोविंदवार सेवानिवृत्त एम ई एल कर्मचारी यांचे सुपुत्र शुभम गोविंदवार यांनी पटकावला व काल हा पुरस्कार त्याला प्राप्त झाला तर द्वितीय विजेता म्हणून दिल्ली येथील शिवम रॉयल तृतीय क्रमांक पुणे येथील राहुल लोखंडे यांनी पटकाविला तसेच मिस मध्ये प्रथम क्रमांक वीरश्री खोब्रागडे द्वितीय क्रमांक प्राजक्ता बुरडकर आणि तृतीय क्रमांक प्रतिक्षा मैदपवार यांनी पटकाविला शुभमने या क्षेत्रामध्ये आपले स्थान मिळविण्याकरिता खूप परिश्रम घेतले
मिस्टर अँड मिस इंडिया 2021 चा हा किताब पटविणारा तीस वर्षीय शुभम हा इंजीनियरिंग कॉलेज चा विद्यार्थी असून पुणे येथे पार पडलेल्या या टप्प्यावर मिळालेल्या यशाच्या आनंदही त्याने व्यक्त केला ज्यावेळी तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी जिद्द आणि संपूर्ण समर्पक तेने प्रयत्न करतात तेव्हा तुमच्या शरीरातील प्रत्येक अवयव प्रत्येक पेशी की त्या लक्ष्याच्या दिशेने काम करते व त्या यशाच्या वाटेवर वाटचाल करण्यास सुरुवात करते असे तो म्हणाला यापूर्वीसुद्धा या क्षेत्रामध्ये मिस्टर चंद्रपूर 2018 मिस्टर विदर्भ 2018 मिस्टर इंडिया 2019 असे किताब जिंकलेल्या आहे
या शोचे दिग्दर्शक निखिल कडूकर राज कुरेशी पंकज पेरगे हे होते पुण्यात रंगलेल्या या मिस्टरअँड मिस या स्पर्धेचे प्रथमच आयोजन शासनाच्या सर्व नियम आधिन राहून करण्यात आले असून ही स्पर्धा उत्साहात पार पडली शुभमने आपल्या यशाचे श्रेय आपली आई कल्पना गोविंदवार परीक्षक मित्रपरिवार परीक्षक फोटोग्राफर यांना दिले शुभम ला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सन्मानित झाल्याने चंद्रपूरकर, महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा चंद्रपूर यांनी त्याचे कौतुक केले आहे
सौंदर्यस्पर्धा ला इंग्रजी मध्ये ब्यूटी कॉन्टेस्ट/पॅजन्ट असे म्हणतात. स्त्री किंवा पुरुष यांच्या शरीरसौष्ठवाची सौंदर्याच्या दृष्टिकोनातून परीक्षा घेण्यासाठी आयोजित केलेली स्पर्धा. व्यक्तीचे सौंदर्य, शरीरयष्टी, बुद्धिमत्ता, जीवनाकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोन इत्यादींना या स्पर्धेत महत्त्व असते.