देवाने दावली लीला' अन् भाजपने मनपा झोन ३ गमावला !

'देवाने दावली लीला' अन् भाजपने मनपा झोन ३ गमावला !

दिनचर्या न्युज
चंद्रपूर :-
नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिकांच्या प्रभाग समिती१,२ व ३ च्या निवडणुकीत सत्तेत असलेल्या भाजप पक्षाच्या एकाधिकारशाहीला प्रभाग समिती ३ मुळे खिंडार लागली. प्रभाग समिती १ मधून छबूताई वैरागडे व २ मधून खुशबूताई चौधरी बिनविरोध निवड झाली. मात्र ३ मध्ये भाजपने एका दिवसा आधी आपला उमेदवार बदलल्याने मत प्रवाह बदलला. आधी ज्यांचे नाव चर्चेत होते ते प्रदीप कीरमे बाबुपेठ प्रभाग इथून पहिल्यांदा भाजपाचा कमळ उमलवून आणला होता. त्यामुळे पक्ष श्रेष्ठीनी त्यांना शब्द दिल्यानंतर ऐन निवडणुकीच्या आधी उमेदवार बदलल्याने बाबुपेठ प्रभागात असणारे नगरसेवक नाराज झाले. ज्यात बसपाचे अनिल रामटेके, स्नेहल रामटेके नाराज झाले. बसपा , मनसे हा भाजपचा मित्रगट . त्यामुळे भाजपला महानगर पालकेत आपली सत्ता सातत्याने प्रस्थापित करता आली होती. पण ह्या प्रभाग समितीच्या निवडणुकीत बसपाला व मनसेला विश्वासात न घेता प्रदीप किरमेच्या जागी सोपान वायकर यांचे नाव पुढे आल्याने नाराज मित्रगट मौन होता व मतदानाची प्रतिक्षा करीत होता.
काही दिवसा आधी आमसभेत सचिन भोयर यांनी अमृत वरून मुद्दा मांडल्याने गदारोळ झाला व त्यामुळे महापौर यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करीत कार्यवाही केली त्यामुळे सचिन भोयर हे सुद्धा नाराज होते.
म्हणून ऐन निवडणुकीच्या मैदानात ऐन क्षणी भाजपचे काँग्रेसच्या तुलनेने संख्याबळ अधिक असताना मतदानाने भाजपाचा भ्रम तुटला कारण अनिल रामटेके, स्नेहल रामटेके व सचिन भोयर यांनी काँग्रेसला मतदान करून भाजपाच्या बरोबर काँग्रेसचे संख्याबळ आणून ठेवले.
शेवटी ईश्वर चिट्टीची वेळ आली आणी ईश्वराने भाजपाचे गर्वाचे घर केले . पण ह्या सगळ्यात अमजद अली हे प्रदीप किरमेचे नाव ऐन वेळी डावलल्याने नशीबवान ठरले हे मात्र निश्चित.