चंद्रपूर पंचायत समिती येथील काही निवडक कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता,बाकीच्याना जाणीव पूर्वक ठेंगा!




चंद्रपूर पंचायत समिती येथील काही निवडक कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता,बाकीच्याना जाणीव पूर्वक ठेंगा!

दिनचर्या न्युज :-
चंदपुर
चंद्रपूर पंचायत समिती येथील कर्मचाऱ्यांना मागील काही वर्षा पासून डिसेंबर 2015 पर्यंत 15 वित्त आयोगाच्या पंधरा टक्के नक्षलग्रस्त प्रोत्साहन भत्ता हा दिला जात असतो. प्रत्येक कर्मचाऱ्यांना त्याच्या बेसिक प्रमाणे प्रोत्साहन भत्ता मिळण्याची तरतूद असताना मात्र पंचायत समितीच्या काही निवडक सहा कर्मचाऱ्यांचा प्रोत्साहन भत्ता मिळाला आहे.
हा सरळ पंधराशे रुपये प्रति महिनाप्रमाणे काढण्यात आल्याने चांगलेच वादळ निर्माण झाले आहे. यातील चतुर्थ कर्मचारी यांना यापासून दूर ठेवून शासनाची लाखो रुपयाची दिशाभूल करून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस येत आहे. सरळ सरळ जिल्हा परिषद सिओचे पत्र असताना. की काय या सुविधा  संदर्भातील प्रोत्साहन भत्ता  कर्मचार्‍याचा  काढायचा नसताना देखिल येथील   निरीक्षक असलेल्या कर्मचाऱ्यांनी काही निवड कर्मचाऱ्याचे नक्षलग्रस्त प्रोत्साहन भत्ता उचलून प्रशासनाची दिशाभूल केली आहे.  ऐरियस  संदर्भात बिडीओला सुध्दा याची कल्पना नसुन या अगोदर असलेल्या बिडीओच्या  कार्यकाळात असल्याचे बोलले जात आहे.यांना  संभ्रमात ठेवून निधीची अफरातफर  केला असुन जवळपास कमी-जास्त या सहा कर्मचाऱ्यांनी लाख रुपयापर्यंत निधी  उचल्याची चर्चा आहे.
  यासंदर्भात पंचायत समिती येथे ठराव मंजूर करण्यात आला असल्याची विश्वसनीय  वृत्त आहे. याबाबत पंचायत समितीत चंद्रपूर येथे कार्यरत कर्मचा-यांना पाचव्या वेतन आयोगानुसार १५% नक्षलग्रस्त आदिवासी प्रोत्साहन भत्ताची थकबाकी देण्याबाबतच्या सुचना सन्मा. श्री. चंद्रकांत घोडरे.पं.स.सदस्य यांनी सभागृहात केल्या असून या संदर्भात लवकरच  प्रकरणाचा  उलगडा होऊन शासनाच्या झालेल्या लाखो रुपयाचा प्रोत्साहन भत्ता हा निवडक कर्मचाऱ्याला का मिळाला, बाकीच्यांना का नाही यासंदर्भात पंचायत समिती येथे संभ्रम निर्माण झालेला आहे.