रेशनच्या कार्डवरील एक किलो गव्हाणे गरिबाचे पोट भरेल का?


रेशनच्या कार्डवरील एक किलो गव्हाणे गरिबाचे पोट भरेल का?

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर:-
सामान्य वर्गातील गोरगरिबांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत धान्य वाटप केले जातात . या योजनेअंतर्गत पाच किलो मोफत धान्य दिले जात आहे. मात्र गोरगरिबांना मिळणा -या धान्याचा वाटपात सरकारने कटोती करून पर व्यक्ती एक किलो गव्हाचे वाटप केले जात आहेत. मात्र या एक किलो गव्हात गरिबाचे पोट भरेल का? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.
विदेशातून येणाऱ्या रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे देशात गव्हाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या योजनेंतर्गत राज्याला देण्यात येणाऱ्या गव्हाला लगाम लावली आहे. सर्वसामान्यांना आधार असलेला रेशनचा मोफत गहू ३ किलो ऐवजी एक किलो मिळत असून 4 किलो तांदूळ मिळत आहे.
याआधी 3 किलो तांदूळ व 2 किलो गहू असे पाच किलो धान्य लाभाव्यांना वाटप केले जात होते. आता गहू कमी करून तांदूळ वाढविला आहे.

कार्डधारकांना अल्प दरातील धान्य अधिक मोफत असे दुप्पट धान्य घरात येत आहे. कोरोनामुळे केंद्र शासनामार्फत पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतर्गत गरिबांना मार्च एप्रिल 2020 पासून मोफतचे धान्य देण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री यांनी गरीबांना मे 2021 या एक महिन्यासाठी मोफत धान्य वाटपाची योजना जाहीर केली होती.
पुरवठा विभागात स्वस्त धान्य माध्यमातून धान्याचे वितरण करण येते. अंत्योदय कार्डधारकांना 5 किलो गहू व 30 कि तांदूळ 1किलो साखर प्राध्यान्य गटातील प्रत्येक लाभार्थ्या किलो दोन किलो तांदळाचे या करण्यात येते. मात्र आता या सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा संरक्षण विभाग विभागाने कटोती केली आहे. यामुळे सर्व गोर गरीब कुटुंबांना एक किलो गावामध्ये महिनाभर उपजिवीका करणार का ?असा प्रश्न पडला आहे.