बालाजी वार्डत मनपा कचरा उचलत नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात!




बालाजी वार्डत मनपा कचरा उचलत नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात!

दिनचर्या न्यूज:-
चंद्रपूर-:-
चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये सध्या प्रशासनाचे राज्य सुरू असून. मागील जवळपास दहा महिन्यापासून येथील सत्ताधाऱ्यांचे राजकीय कारकीर्द संपुष्टात आली आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या कचरा संकलन कंत्राटदार पद्धतीने सुरू असून अनेक वार्डात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहेत. असाच शहरातील मध्य भागात असलेल्या बालाजी वार्ड हनुमान मंदिराजवळ खाली असलेल्या जागेत नागरिकांनी कचरा डम्पिंग करण्याचे काम सुरू केले आहे. यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना घाणीचा, डासांचा, आणि गढूळ पाणी असल्यामुळे जनावराचा मुक्त संचार वाढला आहे. वार्डात सध्या नगरसेवक नसल्याने सफाई कामगारही याकडे दुर्लक्ष करीत आहेत. वारंवार माजी नगरसेवकांना सांगूनही कुणीही या घाणीकडे लक्ष देत नाही. इथे कचरा डम्पिंग असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना   वार्डातील लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कचरा संकलन करण्यासाठी येणाऱ्या गाडीला वार्डातील नागरिकांनी आवाज दिला तरी गाडी थांबत नसल्याचा वार्डातील नागरिकाचा आक्रोश आहे. या ठिकाणी घाण युक्त पाणी साचल्याने रोगराई   पसरल्यास वार्डातील नागरिकाचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर बालाजी वार्डातील नागरिकांना शुद्ध पाणी पिण्याच्या पासूनही मनपाचे दुर्लक्ष होत आहे. या सर्व बाबींकडे मनपाने त्वरित लक्ष देऊन  वार्डातील नागरिकांच्या समस्या  दूर कराव्या अशी मागणी बालाजी वार्डवासीय नागरिकांकडून होत आहे.