जिल्हा परिषद वित्त विभागातील अधिकारी,कर्मचारी वर्षानुवर्ष एकाच विभागात 'घर जावई' म्हणून कार्यरत!

जिल्हा परिषद वित्त विभागातील अधिकारी,कर्मचारी वर्षानुवर्ष एकाच विभागात 'घर जावई' म्हणून कार्यरत!

... बघा काय आहे बदली होवूनही टेबल न सोडण्याच कारण?

दिनचर्या न्यूज:-
चंद्रपूर:-
जिल्ह्याची मिनी मंत्रालय समजणारी जिल्हा परिषद अनेक कारणास्तव चर्चेत असतेच असते. सध्या जिल्हा परिषद मध्ये प्रशासनाचे राज्य सुरू असून मिनी मंत्रालयात सध्या कुठल्याही पक्षाची सत्ता नसल्याने प्रशासनाचे देखरेखी खाली सगळे सर्व काम सुरू आहे. अशातच नवीन सिओ जिल्हा परिषदला लाभलेले आहेत. आता यांच्याकडे सर्वात मोठी जबाबदारी म्हणजे जिल्हा परिषदमधील अनेक विभागात कित्येक वर्षापासून एकाच विभागात एकाच टेबलवर कार्यरत असलेले कर्मचारी अधिकारी ठान मांडून , 'घर जावई' म्हणून बसले आहेत. खास करून वित्त विभागातील मोठा भोंगळ कारभार जिल्हा परिषद मध्ये उघडकीस येत आहे. या विभागातील कनिष्ठ लेखा अधिकारी, ज्येष्ठ सहाय्यक लेखा, कनिष्ठ सहाय्यक लेखा, अशा अनेक पदावर असलेल्या कर्मचारी अधिकाऱ्याने जिल्हा परिषद मध्ये बस्तान, ठाण मांडून बसले आहेत.
यांच्या कधी न होणाऱ्या बदल्या हा जिल्हा परिषद मधील फार मोठा  चिरीमिरीचा व्यवहार असल्याचे बोलले जात आहे. या विभागात राहून  अधिकाऱ्यांचे  खिसे गरम होत असल्याने जिल्हा परिषद च्या मुख्य तिजोरीला चुना लावल्या जात आहे.
इमरान सय्यद कनिष्ठ लेखा अधिकारी पंचायत समिती नागभीड येथे सन 2020-21 ला प्रशासकीय बदली झाली होती. तरीसुद्धा वित्त विभाग जिल्हा परिषद(अंकेक्षक बांधकाम) वित्त विभागात प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत. प्रशांत  घोरसारीया ज्येष्ठ सहाय्यक लेखा पंचायत समिती पोभुरणा येथे बदली झाली असताना सुद्धा,  विभाग चंद्रपूर जिल्हा परिषद येथे प्रतिनियुक्तीवर गेल्या पंधरा वर्षापासून एकाच टेबलवर कार्यरत आहेत.   जिल्ह्यात कुठेही बदली बदली झाली तरी , परत पावली अधिकाऱ्याची   चिरीमिरी हितसंबंध साधून पुन्हा त्याच टेबलवर आपले बस्तान मांडून बसले आहेत.  अमित घोरसाऱीया कनिष्ठ लेखा अधिकारी म्हणून पंचायत समिती  पोभूर्णा भरून येते. पदोन्नती झाली परंतु त्यांनी विभागीय आयुक्त नागपूर वरून प्रतिनियुक्ती करून घेतली आहे. वित्त विभागाच्या अंकेक्षक सिंचाई  मलाईदार असलेल्या टेबलवर काम करण्याची संधी प्राप्त केली आहे. त्यामुळे पंचायत समिती स्तरावरील रिक्त असलेल्या कर्मचाऱ्यावर कामाचा  व्याप वाढत आहे.
याच विभागातील अमित काकडे ज्येष्ठ सहाय्यक लेखा हे कर्मचारी अनुकंपाधारक असून यांना दोन वर्षे झालेली आहेत त्यांच्याकडे   शिक्षकेतर वेतन निश्चित पडताळणीचे टेबल असून एका सेवा पुस्तकाचे  टोकन घेतल्याशिवाय पडताळणी करीत नाहीत. समजा चिरीमिरी दिली नाही तर त्यांच्या सेवा पुस्तकात तुमच्याकडून विभागाला परत करीत असल्याची सुद्धा बोंब आहे. याच विभागातील बंडू कुंभारे ज्येष्ठ साहेब लेखा यांची पंचायत समिती पोभूर्णा  येथे सन 2022 -23  मे महिन्यात प्रशासकीय बदली झाली असताना सुद्धा अद्यापही त्यांना भार मुक्त करण्यात आले नाही. अंकेक्षक ग्रामीण पाणी पुरवठा व पशुचे आडिटर या चिरीमिरीच्या टेबलावर कार्यरत असून यांच्यामुळे पंचायत समिती स्तरावरील अनेक पदे रिक्त राहत असल्याची कर्मचाऱ्यांच्या कामात व्याप वाढत आहे. याच विभागात असलेले चंद्रशेखर सोरते कनिष्ठ सहाय्यक लेखा हे वित्त विभागात नव वर्षापासून एकाच टेबलवर कार्यरत असून यांची सुद्धा कुठे बदली करण्यात आली नाही. अनेक अधिकाऱ्याची हितगुज साधून याच विभागात कार्यरत असल्याचे जिल्हा परिषद  खमंग चर्चा आहे. प्रवीण दलाल यांची नऊ  महिन्यापूर्वी कनिष्ठ लेखा अधिकारी म्हणून पंचायत समिती कोरपना येथे पदोन्नती झाली आहे परंतु ते पंचायत समिती स्तरावर कनिष्ठ लेखा अधिकारी पद महत्त्वाचे असून सुद्धा त्यांची प्रति नियुक्ती केली आहे. त्यांचा तीन महिन्याचा प्रति नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यानंतरही त्यांना जिल्हा परिषदेची वित्त विभागातील मोहमाया टेबल सोडण्यास आड काडी येत आहे?. अशा या विभागात कार्यरत असलेल्या मलाईदार टेबल ची मोमाया, चिरीमिरी घेतलेल्या अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची बदली होत का नाही? हा प्रश्न मात्र समस्त जिल्हा परिषद च्या कर्मचाऱ्यांमध्ये भेडसावत आहे? शासनाच्या नियमाला  धरून शासन  निर्णयाप्रमाणे कर्मचाऱ्यांची बदली होत असतात. परंतु जि.परिषद मध्ये रुजू झाले तेव्हा पासून एकाच विभागात एकाच टेबलवर  कार्यरत आहेत.वर्षानुवर्ष का बरं यांची बदली होत नसेल? हा प्रश्न मात्र आता सर्वसामान्य जनतेला भेडसावत आहे? चंद्रपूर जिल्हा परिषद मध्ये मुख्य कार्यपालन अधिकारी(सीओ) या विभागाकडे जातीने लक्ष देतील का? वर्षानुवर्षे एकाच टेबलवर असलेल्या कर्मचारी, अधिकारी यांच्या बदल्या करतील का?  सदर शासनाच्या नियमानुसार दर चार वर्षांनी प्रत्येक विभागातील टेबल बदली बाबत  शासन निर्णय असतात. मात्र सर्व  शासन निर्णयाची  पायमल्ली होत असून. जिल्हा परिषदच्या  मुख्य वित्त विभागातील  भोंगळ कारभार लवकरात लवकर थांबणार का? असा प्रश्न  भेडसावत आहे.  नवनियुक्त सीओ काय कारवाई करतात याकडे संबंधित जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. पुढील अंकात  जिल्हा परिषद मधील.... या विभागाची पोल खोल ?